Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

mission bepicolombo: बुध ग्रहाचे दुसरे उड्डाण पूर्ण; अनोखी छायाचित्रे आली समोर

मिशन बेपीकोलंबोने (mission bepicolombo) बुध ग्रहाचे दुसरे उड्डाण पूर्ण केले आहे. यात बुध ग्रहाच्या (Mercury) सर्वात जवळून काही अतिशय सुंदर छायाचित्रे टिपल्या गेली आहेत. ही छायाचित्रे ग्रहाच्या पृष्ठभागापासून सुमारे 800 किलोमीटर अंतरावरून घेण्यात आली आहेत. युरोप आणि जपान यांच्या बेपीकोलंबो या संयुक्त मोहिमेने बुध ग्रहाचे दुसरे उड्डाण (Flyby) पूर्ण केले आहे. त्याच्या तीन मॉनिटरिंग कॅमेऱ्यांनी […]

mission bepicolombo: बुध ग्रहाचे दुसरे उड्डाण पूर्ण; अनोखी छायाचित्रे आली समोर
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 2:33 PM

मिशन बेपीकोलंबोने (mission bepicolombo) बुध ग्रहाचे दुसरे उड्डाण पूर्ण केले आहे. यात बुध ग्रहाच्या (Mercury) सर्वात जवळून काही अतिशय सुंदर छायाचित्रे टिपल्या गेली आहेत. ही छायाचित्रे ग्रहाच्या पृष्ठभागापासून सुमारे 800 किलोमीटर अंतरावरून घेण्यात आली आहेत. युरोप आणि जपान यांच्या बेपीकोलंबो या संयुक्त मोहिमेने बुध ग्रहाचे दुसरे उड्डाण (Flyby) पूर्ण केले आहे. त्याच्या तीन मॉनिटरिंग कॅमेऱ्यांनी (MCAM) सूर्याच्या सर्वात जवळ असलेल्या या ग्रहाची सुंदर छायाचित्रे पाठवली आहेत. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या बेपीकोलंबो डेप्युटी स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्स मॅनेजर इमॅन्युएला बोर्डोनी म्हणतात की, आम्ही बुध ग्रहाच्या 6 फ्लायबायपैकी दुसरे पूर्ण केले आहे. 2025 मध्ये बुधाच्या कक्षेत पोहोचण्यापूर्वी, पुढील वर्षी तिसरा बेपीकोलंबो हे सूर्याच्या सर्वात जवळच्या ग्रह बुधचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ग्रहाभोवतीची कक्षा आणि गती समायोजित करण्यासाठी बुध ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता होती. तसेच, कक्षेत प्रवेश करण्याचा हा सर्वात सोपा आणि कमीत कमी कमीत कमी इंधनाचा वापर होणारा मार्ग आहे. सध्या उपलब्ध साधनांच्या सहाय्याने अनेक गोष्टींचा तपास सुरु आहे.

bp colambo 1

हे सुद्धा वाचा

बेपीकोलंबो हा सर्वात लहान ग्रहाभोवती फिरतो. ते रात्रीच्या बाजूला होते, ग्रहाच्या पृष्ठभागापासून केवळ 200 किमी अंतरावर, सुमारे पाच मिनिटांनंतर कॅमेराने 800 किमी अंतरावरून ग्रहाची छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. या उपग्रहाने  40 मिनिटे फोटो काढले.

चित्रांमध्ये काही वैज्ञानिक लक्ष्ये दर्शविली आहेत, ज्यांचा बेपीकोलंबोद्वारे अभ्यास केला जाईल. यामध्ये कॅलोरीस बेसिन, जो लावा फील्ड असल्याचे दिसते आणि हेनी क्रेटर, जो एक ज्वालामुखी आहे ज्याचा अभ्यास केला जाईल.

bp colambo 2

डेव्हिड रॉथरी, ESA च्या मर्क्युरी सरफेस आणि कंपोझिशन वर्किंग ग्रुपचे प्रमुख आणि MCAM टीमचे सदस्य म्हणतात की, Mercury Flyby 1 मधील प्रतिमा चांगल्या होत्या, तर Flyby 2 मधील प्रतिमा आणखी चांगल्या आहेत. या चित्रांमध्ये विज्ञानाची अनेक उद्दिष्टे स्पष्टपणे दिसू शकतात. मला या अद्भुत ग्रहाचा ज्वालामुखी आणि टेक्टोनिक इतिहास समजून घ्यायचा आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.