Navratri Foods: नवरात्रीच्या उपवासात करा या पदार्थाचे सेवन, भूक भागण्यासोबतच मिळतील आरोग्यदायी फायदे

नवरात्राच्या उपवासात पौष्टिक पदार्थाचे सेवन करणे महत्त्वाचे असते. अशातच वर्षानुवर्षे चालत आलेल्या उपवासाच्या खास पदार्थाबद्दल जाणून घेऊया

Navratri Foods: नवरात्रीच्या उपवासात करा या पदार्थाचे सेवन, भूक भागण्यासोबतच मिळतील आरोग्यदायी फायदे
नवरात्रीच्या उपवासात करा या पदार्थाचा समावेश Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 7:36 PM

मुंबई, सध्या देशभरात नवरात्रोत्सव (Navratri 2022) साजरा होत आहे. या पवित्र दिवसात भक्त वेगवेगळ्या प्रकारे देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उपासना करतात. त्यापैकीच एक उपवास आहे. नवरात्रीच्या काळात उपवासाच्या (Upwas recipe) वेळी भूक आणि तहान वेळेवर भागविल्या न गेल्यास आरोग्य  बिघडू शकते. बराच वेळ उपाशी राहिल्याने अशक्तपणा किंवा चक्कर येऊ शकतात. विशेषतः ज्यांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते त्यांना उपवासाच्या वेळी या समस्या जाणवतात. त्यामुळे उपवासात  अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे भूकही दूर होते आणि पोषणही होईल.

साबुदाणा हे एक सुपरफूड आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, लोह, पोटॅशियम, कोलेस्ट्रॉल, फॅट, प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. जर तुम्ही उपवासाच्या वेळी साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

 रक्तदाब नियंत्रणात राहतो

उपवासात तुम्ही साबुदाणा अनेक प्रकारे खाऊ शकता. तसे, बहुतेक लोकांना त्याची खिचडी खायला आवडते.  अँटीऑक्सिडंटने भरपूर साबुदाणा खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामध्ये असलेले पोटॅशियम तुमचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

हाडांसाठी फायदेशीर

कमकुवत हाडांची समस्या असेल साबुदाण्याचे सेवन करावे. हाडे आणि दातांसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम हे साबुदाणामध्ये मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि लोह हाडे निरोगी ठेवण्याचे काम करतात.

ऊर्जेचा स्रोत

साबुदाणा हे सुपरफूड देखील मानले जाते कारण ते खाल्ल्यानंतर शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. दिवसाच्या सुरुवातीला साबुदाणा खिचडी खाल्ल्यास तुम्हाला दीर्घकाळ उत्साही वाटेल. याचा एक फायदा म्हणजे वजन कमी होण्यासही मदत होते. त्यातील घटक केवळ वजन कमी करत नाहीत तर तुम्हाला अन्नाच्या लालसेपासून दूर ठेवतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.