Numerology 16 june 2022: कोणाच्या नशिबात आहे वाहन खरेदीचा योग; आजचा शुभ अंक आणि शुभ रंग
अंकशास्रानुसार (Numerology 16 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = […]
अंकशास्रानुसार (Numerology 16 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (16 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की, नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.
- अंक-1 आज पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. इतरांसोबत निष्क्रिय बसून वेळ घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा , तरच तुम्ही ती वेळेवर पूर्ण करू शकाल. शुभ अंक- 21 शुभ रंग- हिरवा
- अंक- 2 तुमच्या मनात काही समस्या असतील तर तुम्ही अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन त्या सोडवू शकता. मालमत्तेची खरेदी-विक्री पुढे ढकला . शुभ अंक- 12 शुभ रंग- भगवा
- अंक- 3 वाहन खरेदीचा योग आहे. पैसे उधार देणे टाळा. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. शुभ अंक – 15 शुभ रंग – जांभळा
- अंक-4 वाणीवर संयम ठेऊन तुमची अनेक कामे मार्गी लावाल. हितशत्रुपासून सावध राहा. राजकीय पाठबळ मिळाल्याने तुमचे मन आनंदित होईल. शुभ अंक- 17 शुभ रंग – नारिंगी
- अंक- 5 आजचा दिवस तुमच्यासाठी समाधानाचा असेल. कोणतेही काम पूर्ण झाल्यावर तुमचा स्वभाव आणि वर्चस्व वाढेल. सासरच्या मंडळींकडून त्रास संभवतो. शुभ अंक- 9 शुभ रंग- गुलाबी
- अंक- 6 आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेला अडथळा संपेल. रखडलेली कामे पूर्ण होतील, त्यानंतर कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी पार्टीचे आयोजन करू शकतात. शुभ अंक- 14 शुभ रंग- लाल
- अंक- 7 आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. व्यवसायाशी संबंधित जवळच्या आणि दूरच्या प्रवासाला जाऊ शकतात. तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. शुभ अंक- 16 शुभ रंग – पांढरा
- अंक- 8 कार्यक्षेत्रात तुमचे आवडते काम मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल, परंतु घाईने केलेले काम तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. शुभ अंक- 11 शुभ रंग- तपकिरी
- अंक- 9 परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाग्रतेने लक्ष द्यावे लागेल, तरच यश मिळेल. तुमच्या हातात अनेक कामे एकत्र आल्याने त्रासून जाल. भाग्यवान क्रमांक – 29 शुभ रंग – राखाडी
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)