Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 3 july 2022: कोणाला मिळणार नोकरीमध्ये नवी संधी?; शुक्रवारचा शुभ अंक

एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे.

Numerology 3 july 2022: कोणाला मिळणार नोकरीमध्ये नवी संधी?; शुक्रवारचा शुभ अंक
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:30 PM

अंकशास्त्रानुसार (Numerology 3 july 2022) , एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (3 july lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.

  1. अंक- 1 आजचा दिवस संमिश्र जाईल. धनलाभासह खर्चही वाढू शकतो. कुटुंबातील सदस्याचे आरोग्य तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. सामाजिक संमेलने, क्लबमध्ये पार्टी किंवा रेस्टॉरंटचा आनंद घेण्यासाठी वेळ काढाल. पैशाचा सदुपयोग करा आणि अनावश्यक खर्च टाळा. शुभ अंक- 12 शुभ रंग – नारिंगी
  2. अंक- 2 दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कार्यालयीन कामात मन रमेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांसाठी तसेच भविष्यातील योजना बनवण्यासाठी वेळ चांगला आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. स्वप्न रंगविण्यात वेळ घालविणे आणि काम पुढे ढकलणे टाळा. मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. शुभ अंक- 23 शुभ रंग – गुलाबी
  3. अंक- 3 आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक सुवर्ण संधी घेऊन येईल. योग्य पाऊलं उचलली तर तुम्हाला भरपूर लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे. इतर लोक कामावर तुमच्या नेतृत्व कौशल्याची दखल घेतील. आर्थिक उत्पन्नाचा नाव स्रोत मिळण्याची दाट शक्यता आहे. शुभ अंक- 27 शुभ रंग- लाल
  4. अंक- 4 संपूर्ण दिवस गर्दीतच जाईल. आज तुम्हाला वाद टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज, बहुतेक वेळ पैशाची प्रकरणे निकाली काढण्यात खर्च होईल. कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुमान टाळा. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडे हुशारीने काम करा. शुभ अंक – 14 शुभ रंग – पिवळा
  5. हे सुद्धा वाचा
  6. अंक- 5 आजचा दिवस सामान्य जाईल. तुम्हाला दिवसभरात अनेक बदलांमधून जावे लागेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. बदल आवश्यक आहे, म्हणून स्वीकारा. कार्यालयात कट-कारस्थान रचणाऱ्यांपासून सावध राहा. शुभ अंक- 31 शुभ रंग – गुलाबी
  7. अंक- 6 आजचा दिवस तुम्ही एकांतात घालवाल. एकाकीपणाचा हा काळ तात्पुरता आहे जो तुम्हाला नवीन दृष्टीकोन प्रदान करेल. तुम्हाला तुमच्या आत अद्भुत ऊर्जा जाणवेल. अतिउत्साहीत होऊन कोणताही निर्णय घेणे टाळा. आजचा दिवस तुमच्यामध्ये काही अंतर्गत आणि बाह्य बदल घडवून आणेल. शुभ अंक- 10 शुभ रंग – पांढरा
  8. अंक- 7 आजचा दिवस संमिश्र जाईल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. लेखन, संगीत, कला याद्वारे स्वतःसाठी वेळ काढाल. अलगाव आणि एकाकीपणाचा हा टप्पा तात्पुरता आहे आणि भविष्यात तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळतील. शुभ अंक- 21 शुभ रंग- हिरवा
  9. अंक- 8 नोकरीत आजचा दिवस त्रासाने भरलेला असेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त असाल. जुन्या आठवणी सोडा आणि जीवनाचा आनंद घ्या. भविष्याचा विचार करून योजना बनवा. शुभ अंक- 25 शुभ रंग – नारिंगी
  10. अंक- 9 आजचा दिवस तुमच्यासाठी अनिष्ठ आहे. आर्थिक फसगत होण्याची संभावना आहे. आयुष्यातल्या महतवाच्या टप्प्याचा निर्णय आज घ्यावा लागू शकतो. कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्या. शुभ अंक- 7 शुभ रंग – भगवा 

    (वरील माहिती अंकशास्त्राच्या आधारे देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाही हेतू नाही)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.