OM Chanting Benefits | सकारात्मक ऊर्जेने आयुष्याला नवी दिशा द्यायची आहे? , मग अशा प्रकारे करा ओम नामाचा जप

हिंदू धर्मात ओम या शब्दाला विषेश महत्त्व आहे. ओम हा मंत्र योग किंवा ध्यानाच्या सुरूवातीस जपला जातो. जरी ओमचा जप हा एक छोटासा शब्द वाटत असला तरी या मंत्रामध्ये प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक शक्ती आहे असे मानले जाते.

OM Chanting Benefits | सकारात्मक ऊर्जेने आयुष्याला नवी दिशा द्यायची आहे? , मग अशा प्रकारे करा ओम नामाचा जप
om
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 11:47 AM

मुंबई : हिंदू धर्मात ओम या शब्दाला विषेश महत्त्व आहे. ओम हा मंत्र योग किंवा ध्यानाच्या सुरूवातीस जपला जातो. जरी ओमचा जप हा एक छोटासा शब्द वाटत असला तरी या मंत्रामध्ये प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक शक्ती आहे असे मानले जाते. हिंदू संस्कृतीनुसार, हा विश्वाचा पहिला ध्वनी आहे असे म्हटले जाते. ओमच्या जपाने एकाच वेळी शरीर आणि मन सक्रिय होते. पण योग्य रीतीने जप केल्यास शरीराला भरपूर प्रमाणात सकारात्मकता, शांती आणि उर्जा मिळते.

ओम नाम जपाचे फायदे

  • ओम नामच्या जपामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
  • यामुळे तुम्ही कोणताही तणावापासून मुक्तता मिळवू शकता, हा जप तुम्हाला चिंतामुक्त करतो.
  • यामुळे तुमच्या भावनांचा समतोल राखण्यास आणि तणावपूर्ण परिस्थितीतही शांत राहण्यास मदत होते.
  • ओमचा जप केल्याने एखादया गोष्टीतला तुमचा फोकस सुधारतो.
  • तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता शक्ती सुधारते.
  • हा जप तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि तुम्हाला अधिक आशावादी बनवते.
  • रागासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहण्यास मदत करते.
  • जर तुमच्या पोटात दुखत असेल तर ओमचा जप तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे.
  • ओमचा जप केल्याने तुमच्या संपूर्ण जीवाला मनःशांती आणि आरोग्य मिळते.
  • याव्यतिरिक्त, ते आपल्या शरीराला आराम देते आणि रक्तदाब नियंत्रित करते.

ओमचा जप केल्याने तुमच्या शरीरात स्पंदने निर्माण होतात, ज्यामुळे तुम्हाला शांत आणि आनंदी ऊर्जा निर्माण होते. जितक्या वेळा तुम्ही ओमचा जप कराल तितका तुमचा स्रोताशी असलेला संबंध अधिक मजबूत होईल.

ओमचा जप करण्याची चांगली वेळ

सकाळी 6, दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 आहे, याला संध्याकाळ किंवा शुभ वेळ म्हणतात.सुरुवातीला तुम्ही 108 वेळा सुरू करू शकता आणि हळूहळू ते 200-300 पर्यंत वाढवू शकता. तुम्ही महिन्यातून एकदा 1008 वेळा नामजप देखील करू शकता. दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही ओमचा जप करू शकता आणि कोणीही करू शकतो.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

इतर बातम्या

रुद्राक्षाचे हे लाभ तुम्हाला माहितीयेत का? जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे

Indian Traditions | टिळा लावण्यापासून ते आशीर्वाद घेण्यापर्यंत, जाणून घ्या 5 भारतीय परंपरांबद्दल विज्ञान काय सांगते

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.