श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कान्होपात्रांची आठवण असणारे झाड पुन्हा बहरणार

संत कान्होपात्रा हीची भक्ती सुद्धा विठ्ठलाने स्वीकारली. आपल्या लाडक्या भक्ताची आठवण पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका झाडाच्या रुपात होती. पण, कालांतराने हे झाड वाळून गेले. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे (Pandharpur Vitthal-Rukmini Mandir Samiti Will Decide To Replant Kanhopatra Tree).

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कान्होपात्रांची आठवण असणारे झाड पुन्हा बहरणार
कान्होपात्रा झाड
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 10:46 AM

पंढरपूर : मंगळवेढा येथील गणीकेची मुलगी असलेली कान्होपात्रा विठ्ठल भक्त झाली. संत कान्होपात्रा हीची भक्ती सुद्धा विठ्ठलाने स्वीकारली. आपल्या लाडक्या भक्ताची आठवण पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका झाडाच्या रुपात होती. पण, कालांतराने हे झाड वाळून गेले. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे (Pandharpur Vitthal-Rukmini Mandir Samiti Will Decide To Replant Kanhopatra Tree).

मात्र, हे झाड आता शंभर वर्षे जुने झाले आहे. त्यामुळे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने कान्होपात्रा झाड आता नव्याने लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

कान्होपात्रा कोण होती?

कान्होपात्रा ही एका गणीकेची मुलगी होती. ती दिसायला अत्यंत सुंदर असल्याने तिच्या सौंदर्याची माहिती तत्कालीन बिदरच्या बादशहापर्यंत गेली. कान्होपात्राला पकडून आणण्यासाठी बादशहाने आपले सरदार पाठवले. स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याकरता कान्होपात्रा वेश बदलुन वारीत सहभागी झाली आणि पंढरपुरात पोहोचली. विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून तिने आपले रक्षण करण्याची विठ्ठलाला आर्त विनवणी केली.

संत कान्होपात्रा यांनी विठ्ठलाच्या प्रेमाखातीर मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे समाधी घेतल्याची आख्यायिका आहे. या समाधी जवळच शंभर वर्षांपूर्वीचे तरटीचे झाड उगवले होते. हे झाड कान्होपात्रा या नावाने प्रसिद्ध आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन मंडपातून बाजीराव पडसाळीकडे भाविक आल्यानंतर कान्होपात्रा झाडाचे दर्शन घेऊनच विठ्ठलाचे दर्शन घेत असतात.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे झाड पूर्णपणे सुकून गेले आहे. त्यामुळे वारकरी भाविकांची श्रद्धा लक्षात घेता, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून संत कान्होपात्रा वृक्षाचे संवर्धन करण्यात येणार आहे. कान्होपात्रा नावाचे वृक्ष येत्या आषाढी एकादशी दिवशी लावण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना पुन्हा एकदा झाडाच्या रुपात कान्होपात्रा आठवणीत राहणार आहे.

Pandharpur Vitthal-Rukmini Mandir Samiti Will Decide To Replant Kanhopatra Tree

संबंधित बातम्या :

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, वारकरी संप्रदाय म्हणतो राजकीय नेता नको

Photo : पहावा विठ्ठल… मोहिनी भागवत एकादशी निमित्त आकर्षक फुलांनी सजले विठ्ठल मंदिर!

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.