Pandharpur Wari 2022: पालखी सोहळ्यासाठी इंदापूर नगरी सज्ज; पालखीतील दिंडी शिल्पामुळे शहरातील सौंदर्यात भर

इंदापूर तालुक्यात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram mahraj Palkhi) सोहळा असून उद्या हा सोहळा इंदापूर शहरात नारायणदास रामदास या ठिकाणी दोन दिवस मुक्कामी असणार आहे, पालखी सोहळा आगमनापासून ते पंढरपूर पर्यंत कोणत्याही भागात हा पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी नसतो, मात्र इंदापूरमध्ये असलेली स्वच्छता, पाण्याची सुविधा व वारकऱ्यांना मिळणाऱ्या इतर सोयी  सुविधा यामुळे […]

Pandharpur Wari 2022: पालखी सोहळ्यासाठी इंदापूर नगरी सज्ज; पालखीतील दिंडी शिल्पामुळे शहरातील सौंदर्यात भर
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:24 PM

इंदापूर तालुक्यात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram mahraj Palkhi) सोहळा असून उद्या हा सोहळा इंदापूर शहरात नारायणदास रामदास या ठिकाणी दोन दिवस मुक्कामी असणार आहे, पालखी सोहळा आगमनापासून ते पंढरपूर पर्यंत कोणत्याही भागात हा पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी नसतो, मात्र इंदापूरमध्ये असलेली स्वच्छता, पाण्याची सुविधा व वारकऱ्यांना मिळणाऱ्या इतर सोयी  सुविधा यामुळे इंदापूर शहरात दोन दिवस मुक्कामी असल्याचं सांगण्यात येते. ज्या ठिकाणी ही पालखी (pandharpur wari 2022) ठेवली जाते त्या स्थळासमोरील रस्त्याच्या मधोमध आकर्षक अशी पालखीची दिंडीची शिल्पे साकारली असून या शिल्पामुळे इंदापूर नगरीच्या सौंदर्यात भर पडली आहे. जवळपास 32 शिल्पे असून यात पालखी रथ, विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, पखवाज व मृदंग घेऊन असलेले वारकरी, तुळशी वृंदावन घेऊन असलेल्या महिला वारकरी, वासुदेव अशीच आकर्षक शिल्पे उभारण्यात आली आहेत.

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विठुरायाचे 24 तास दर्शन

तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पंढरपूरमध्ये (Pnadharpur wari 2022) एकादशीचा मोहत्त्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वारीत विक्रमी वारकरी सामील झाल्याने भाविकांची गैरससोय टाळण्यासाठी  24 तास दर्शन (24 hours dharshan) व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. चोवीस तास दर्शनाला उभे राहून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे.  इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारतीपर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते.त्यानंतर मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळं दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्यासाठी दर्शन बंद राहणार असून, उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र  दर्शन घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.