Gemstone | डिप्रेशन मध्ये आहात? कितीही प्रयत्न केलेत तरी मार्ग निघत नाही? मग मोती करेल तुमची मदत

रत्नशास्त्रामध्ये अनेक रत्नांची (Gemstone) माहिती देण्यात आली आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवर ही रत्न आपल्याला मदत करतात.

Gemstone | डिप्रेशन मध्ये आहात? कितीही प्रयत्न केलेत तरी मार्ग निघत नाही? मग मोती करेल तुमची मदत
use gem
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 10:49 AM

मुंबई : रत्नशास्त्रामध्ये अनेक रत्नांची (Gemstone) माहिती देण्यात आली आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवर ही रत्न आपल्याला मदत करतात. ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, रत्न माणसाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. याशिवाय शारीरिक (Boy) आणि मानसिक स्थितीचे संतुलन राखण्यासाठीही रत्ने उपयुक्त ठरतात.मोती आणि चंद्राचा खूप जवळचा संबंध ज्योतिष शास्त्रामध्ये आहे. राशीतील चंद्र अथवा शनी कठोर असेल तर मोती हातात परिधान करण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. ज्यांना मानसिक त्रास किंवा चंद्र ग्रह ज्या राशींसाठी चांगला नाही अशा लोकांना मोती धारण करण्यास सांगितलं जातं. चंद्र (Moon) हा मनाचा कारक आहे आणि मोतीचा प्रभावामुळे चंद्र ग्रह बलवान होतो आणि व्यक्तीला नैराश्यापासून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे.

मोती कधी परिधान करावा ?

ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील चंद्राची महादशा अनुकूल करण्यासाठी मोती धारण केले जातात. यासोबतच कुंडलीत चंद्रासोबत राहू-केतूचा संयोग असला तरीही मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय चंद्र जर पापी ग्रहांच्या दृष्टीत असेल तर अशा स्थितीत मोतीही धारण करतात. जन्मपत्रिकेत चंद्र 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात असतानाही मोती परिधान केले जातात. जेव्हा चंद्र कमजोर असतो किंवा चंद्र-सूर्य संयोग असतो तेव्हा मोती परिधान करतात.

मोती कधी आणि कसा परिधान करावा

ज्योतिषशास्त्रानुसार मोती करंगळीमध्ये परिधान करावा. तसेच तो चांदीच्या अंगठीने धारण करावा. पौर्णिमेच्या दिवशी हे रत्न धारण करणे शुभ मानले जाते. मोती धारण करण्यापूर्वी गंगाजलाने शुद्ध करा. यानंतर ते भगवान शंकराला अर्पण करून धारण करावे.

हिरा, पाचू, गोमेद, लसूण आणि नीलम मोत्याबरोबर घालू नका

जर एखाद्या व्यक्तीने मोती घातला असेल तर त्या व्यक्तीने हिरा, पाचू, गोमेद, लसूण आणि नीलम कधीही घालू नये. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्राचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी मोती धारण केले जातात, परंतु मोत्यासोबत हिरा, पाचू, गोमेद, लसूण आणि नीलम धारण केल्याने अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात.

मोती परिधान करण्याचे फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार मोत्याचा रंग पांढरा असतो. उत्तम दर्जाचे मोती दक्षिण समुद्रात मिळतात. काही मोत्यांना पिवळे पट्टे देखील असतात. मोती चंद्राशी संबंधित आहे. अशा स्थितीत सिंह आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हे विशेष फायदेशीर मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा मनावर प्रभाव पडतो. त्यामुळे मन शांत करण्यासाठी मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. एवढेच नाही तर मोती धारण केल्याने व्यक्तीला नैराश्यातून मुक्ती मिळू शकते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.