शिर्डीत भाविकांची मांदियाळी; उन्हाळी सुट्टयांचा आज शेवटचा दिवस
शिर्डी, आज रविवार असल्याने साई बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत मोठ्या संख्येने गर्दी केली आहे (people rush in shirdi). या महिन्यातला शेवटचा शनिवार-रविवार (weekend) अशी सुटी लागून आली आहे, तसेच सोमवारपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु होणार असल्याने मुलांसोबतच पालकांचीही पावलं शिर्डीकडे वळली आहे. शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र […]
शिर्डी, आज रविवार असल्याने साई बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत मोठ्या संख्येने गर्दी केली आहे (people rush in shirdi). या महिन्यातला शेवटचा शनिवार-रविवार (weekend) अशी सुटी लागून आली आहे, तसेच सोमवारपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु होणार असल्याने मुलांसोबतच पालकांचीही पावलं शिर्डीकडे वळली आहे. शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. कोरोना काळात निर्बंध असल्याने मंदिर बंद होते, त्यामुळे अनेकांना देवदर्शन घेता आले नाही. आता सर्व निर्बंध हटविल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहे. मंदिर सुरु झाल्यापासून 65 लाख भाविकांनी साई बाबांचे दर्शन घेतले. यातून संस्थानाला 188 कोटींची देणगी मिळाली आहे. साई बाबांचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे अनेक भाविक सढळ हाताने दान करतात. यासोबतच मंदिर परिसरात असलेली दुकानंसुद्धा फुललेली दिसत असून स्थानिक व्यवसायिकांनासुद्धा याचा फायदा होत आहे. कोरोना आधीचा काळ आणि कोरोनानंतरच्या काळावर नजर टाकल्यास दानाच्या रकमेत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवीन कोरोनाबाधित होत असल्याने चिंता वाढली आहे. अशातच पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची भीती भक्तांमध्ये असल्याने लाखों भक्त शिर्डी येथे दर्शनासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून आले. शाशनाकडून कोरोनासंदर्भात सध्यातरी कुठलेच निर्बध आलेले नाहीत, पण कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता लवकरच पाऊलं उचलली जाऊ शकतात अशी शक्यता आहे. शिर्डी व्यतिरिक्त इतरही धार्मिक स्थळी भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करीत आहेत.