नवीन वर्षात इच्छापूर्तीसाठी करा पौर्णिमेचे उपवास; 2025 मध्ये कधी, किती पौर्णिमा? वाचा पूर्ण यादी

Purnima Date List 2025: धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्याचबरोबर कळत-नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया 2025 नववर्षातील पौर्णिमेच्या तारखा.

नवीन वर्षात इच्छापूर्तीसाठी करा पौर्णिमेचे उपवास; 2025 मध्ये कधी, किती पौर्णिमा? वाचा पूर्ण यादी
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:45 PM

Purnima Date List 2025 : धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव, भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर कळत-नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया 2025 नववर्षातील पौर्णिमेच्या तारखा.

सनातन धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव, भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पौर्णिमेचे व्रत ठेवले जाते. हे व्रत केल्याने साधकाची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा तिथी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी येते. या दिवशी सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि चंद्राचा प्रकाश दिव्य दिसतो, म्हणून त्याला पौर्णिमा असेही म्हणतात.

पौर्णिमा हा दिवस धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या दिवशी पूजेलाही विशेष महत्त्व आहे. अवघ्या काही दिवसात 2025 हे वर्ष सुरु होणार आहे. जर तुम्हाला पुढच्या वर्षी पौर्णिमेच्या तारखेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊया 2025 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत पौर्णिमेची तारीख कधी पडणार आहे.

पौर्णिमा व्रताचे महत्त्व

पौर्णिमेच्या दिवशी उपवास आणि पूजेचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ अनेक पटींनी वाढते. या दिवशी जर तुम्ही खऱ्या मनाने देवाची पूजा केली तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. विशेषत: भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

2025 नववर्षातील पौर्णिमा कधी आहे?

  • 13 जानेवारी 2025, सोमवार, पौष, शुक्ल पौर्णिमा
  • 12 फेब्रुवारी 2025, बुधवार, माघ, शुक्ल पौर्णिमा
  • 14 मार्च 2025, शुक्रवार, फाल्गुन, शुक्ल पौर्णिमा
  • 12 एप्रिल 2025, शनिवार, चैत्र, शुक्ल पौर्णिमा
  • 12 मे 2025, सोमवार, वैशाख, शुक्ल पौर्णिमा
  • 11 जून 2025, बुधवार, ज्येष्ठ, शुक्ल पौर्णिमा
  • 10 जुलै 2025, गुरुवार, आषाढ़ा, शुक्ल पौर्णिमा
  • 9 ऑगस्ट 2025, शनिवार, श्रावण, शुक्ल पौर्णिमा
  • 7 सप्टेंबर 2025, रविवार, भाद्रपद, शुक्ल पौर्णिमा
  • 7 ऑक्टोबर 2025, मंगळवार, अश्विन, शुक्ल पौर्णिमा
  • 5 नोव्हेंबर 2025, बुधवार, कार्तिक, शुक्ल पौर्णिमा
  • 4 डिसेंबर 2025, गुरुवार, मार्गशीर्ष, शुक्ल पौर्णिमा

एक लक्षात घ्या की, पौर्णिमेला तुम्ही खऱ्या मनाने देवाची पूजा केली तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. विशेषत: भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.