Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

भाऊ बहिणीचं नातं हे एक अनोखे नाते आहे. ते एकमेकांशी भांडतातही आणि तितकंच प्रेमही करतात. हिंदू धर्मात एक असा खास सण आहे जो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तो सण म्हणजे रक्षाबंधन आहे. ज्यात बहीण तिच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
RAKHI
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 12:41 PM

मुंबई : भाऊ बहिणीचं नातं हे एक अनोखे नाते आहे. ते एकमेकांशी भांडतातही आणि तितकंच प्रेमही करतात. हिंदू धर्मात एक असा खास सण आहे जो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तो सण म्हणजे रक्षाबंधन आहे. ज्यात बहीण तिच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. या पौर्णिमेला राखीपौर्णिमा देखील म्हणतात. यावेळी रक्षाबंधनाचा सण 22 ऑगस्ट 2021 रोजी साजरा केला जाईल. या दिवसाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 06 वाजून 15 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील

रक्षा मंत्राचा जप करा –

येन बुद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल| तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल||

या श्लोकानुसार, बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधताना म्हणते की, मी तुला त्याच संरक्षण सूत्रात बांधते ज्यामध्ये महान राजा बलिला बांधण्यात आले होते. हे राखी, तू ठाम राहा. आपल्या बचावाच्या संकल्पाने कधीही विचलित होऊ नको. या इच्छेसह, बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते.

या उत्सवाची तयारी आधीच सुरु होऊन जाते. यासाठी कुमकुम, अक्षता, दिवा, मिठाई आणि राखी एका थाळीमध्ये ठेवा. भावाला टिळा लावा आणि त्याच्या मनगटावर राखी बांधा. भावाची आरती करा, त्याला मिठाई खायला द्या. राखी बांधल्यानंतर भावांनी बहिणीला त्यांच्या क्षमतेनुसार भेटवस्तू दिल्या पाहिजेत.

पौराणिक कथा काय?

पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णू राजा बलिच्या सांगण्यावरुन पाताळात गेले होते. तेव्हा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला त्याने संरक्षक धागा बांधून विष्णूला मागितले होते. या व्यतिरिक्त, आणखी एक आख्यायिका आहे. राजसूयच्या यज्ञात द्रौपदीने राखीऐवजी तिच्या पदराचा तुकडा भगवान श्रीकृष्णाला बांधला होता. मान्यता आहे की की तेव्हापासूनच बहिणींनी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरु झाली.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Kamika Ekadashi 2021 | कामिका एकादशी, जाणून घ्या या एकादशीची कथा आणि महत्त्व

Peepal Tree Upay | संतानप्राप्ती, धन लाभ आणि मंगळ दोष निवारणासाठी पिंपळाच्या झाडाचे ‘हे’ उपाय करा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.