Raksha Bandhan 2023 : 31 ऑगस्टला अमृत कालमध्ये साजरा करा रक्षाबंधन, राखी बांधन्यासाठी हे 48 मिनीट सर्वाधीक शुभ
Raksha Bandhan 30 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस भद्रा असल्याने या तारखेला लोकं भावाला राखी बांधणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक 31 ऑगस्टलाच रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात.
मुंबई : रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023) सण यंदा भद्रा छायेखाली साजरा होत आहे. भाद्र कालावधीमुळे 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधन साजरे केले जात आहे. 30 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस भद्रा असल्याने या तारखेला लोकं भावाला राखी बांधणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक 31 ऑगस्टलाच रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात. पण 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करण्यासाठी त्यांना फारसा वेळ मिळणार नाही. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:05 वाजता श्रावण शुक्ल पौर्णिमा तिथी आणि रक्षाबंधनाचे महत्त्व या दोन्हींची सांगता होईल. अशा परिस्थितीत 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणाऱ्यांना कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधायची याबाबत संभ्रम आहे.
31 ऑगस्टला असा आहे राखीचा मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे अधिक योग्य वाटते. वास्तविक या दिवशी भद्राकाळाची चिंता नाही किंवा अशुभ योगायोगही घडणार नाही. एवढेच नाही तर भावाला राखी बांधण्याचीही उत्तम मुहूर्त या तारखेला आहे. हिंदू पंचांगानुसार 31 ऑगस्टच्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर राखी बांधण्याची सर्वोत्तम वेळ असेल. या दिवशी पहाटे 4.56 ते 5.14 पर्यंत ब्रह्म मुहूर्त असेल. म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर भावाला राखी बांधण्यासाठी तुम्हाला पूर्ण 48 मिनिटे मिळत आहेत. सनातन परंपरेत ब्रह्म मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. या शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधल्याने तो निश्चितच भाग्यवान ठरतो.
रक्षाबंधनाची राखी किंवा रक्षासूत्र लाल, पिवळे आणि पांढरे असे तीन धाग्यांचे असावे. अन्यथा त्यात लाल आणि पिवळा धागा असणे आवश्यक आहे. रक्षासूत्रात चंदन असेल तर ते अधिक चांगले मानले जाते. जर काही नसेल तर कलाव देखील बांधता येईल.
रक्षाबंधन कसे साजरे करावे?
रक्षाबंधनाच्या दिवशी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. देवाची पूजा केल्यानंतर चंदन, अक्षत, दही, रक्षासूत्र आणि मिठाई ताटात ठेवा. तसेच भावाला ओवाळण्यासाठी तुपाचा दिवा ठेवावा. राखी बांधताना डोक्यावर टोपी घालावी. टोपी नसल्यास डोक्यावर स्कार्फ किंवा रुमाल ठेवा. सर्वप्रथम देवाला राखी वाहावी. यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावे. प्रथम भावाला टिळा लावावा. नंतर रक्षासूत्र बांधून भावाला ओवाळावे. यानंतर आपल्या भावाला मिठाई खायला द्या आणि त्याला शुभेच्छा द्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)