Ram Mandir Door : राम मंदिराच्या दारावर सुबक नक्षीकाम, अशी सुरू आहे कार्यक्रमाची तयारी
मंदिराच्या दारांवर अतिशय आकर्षक असं नक्षीकाम करण्यात येत आहे. अनुराधा इंटरनेशनल टिम्बर कंपनीकडे या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. कुशल व अनुभवी कारागिरांनी नगर शैलीत कोरीव नक्षीकाम केलं आहे. या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. या शिवाय मंदिर प्रशासनाकडून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची जेवणाची विशेष व्यावस्था केली गेली आहे.
प्रदीप कापसे, अयोध्या : 22 जानेवारीला राम मंदिरात (Ram Mandir) रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी युद्ध स्थरावर सुरू आहे. राम मंदिराचे बांधकामदेखील अतिशय वेगाने सुरू आहे. मंदिरात लागणाऱ्या दरवाज्यांबद्दल माहिती समोर आली आहे. राम मंदिरात बसवण्यात येणाऱ्या दरवाजाची उंची 9 फूट तर लांबी 12 फूट इतकी आहे. हे दरवाजे महाराष्टा्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातले आहे. गडचीरोली जिल्ह्यातील सागवान संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध आहे. अस्सल सागवानाचे दरवाजे अयोध्येत तयार होत आहेत. या दरवाज्यांमध्ये मुख्य दरवाजाचा देखील समावेश आहे.
कुशल कारागिरांकडून होत आहे काम
मंदिराच्या दारांवर अतिशय आकर्षक असं नक्षीकाम करण्यात येत आहे. अनुराधा इंटरनेशनल टिम्बर कंपनीकडे या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. कुशल व अनुभवी कारागिरांनी नगर शैलीत कोरीव नक्षीकाम केलं आहे. या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. या शिवाय मंदिर प्रशासनाकडून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची जेवणाची विशेष व्यावस्था केली गेली आहे. कुठलाच भाविक हा उपाशापोटी परत जावू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कारसेवकपूरम मध्ये भाविकांच्या जेवणाची व्यावस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रसासनाकडून तब्बल 20 लाख पत्रावळी तयार करण्यात आल्या आहेत.
22 जानेवारीला सुट्टी जाहिर करण्याची मागणी
22 जानेवारीला सुट्टी जाहिर करावी अशी मागणी भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी पंतप्रधान मोदी यांनी पत्र लिहून केली आहे. 22 जानेवारीला अयोध्येत श्री रामाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. श्रीरामाचा उत्सव साजरा करायचा असल्याने कोणालाही सुट्टीची अडचण होऊ नये यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.
वाशिमच्या वाईमध्ये अक्षता कलशाचे पूजन
रामाच्या अयोध्येमधीजल पुजित अक्षदा कलश वाशीमच्या वाईमध्ये आणल्यावर या कलशाचे जोरदार स्वागत करण्यात आले.अक्षदा कलशाच्या पूजनानंतर वाई येथील गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रभू श्रीरामाचे भजन म्हणण्यात आले. गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून आमंत्रनाची अक्षद वाटप करण्यात येणार आहे.