Rang Panchami 2021 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते…

दर वर्षी होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो (Rang Panchami). चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षच्या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते

Rang Panchami 2021 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते...
Rang Panchami
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 2:41 PM

मुंबई : दर वर्षी होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो (Rang Panchami). चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षच्या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे याला कृष्ण पंचमी देखील म्हणतात. या दिवशी लाक राधा-कृष्ण आणि इतर देवी देवतांनाही गुलाल आणि रंग लावतात (Rang Panchami The Day Of Gods Holi Know The Date And Significance ).

रंगपंचमी विशेषकरुन मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये खेळली जाते. यावर्षी रंगपंचमी 2021 (Rang Panchami 2021) 2 एप्रिलला येत आहे. चला जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती

रंगपंचमीचा दिवस देवी-देवतांना समर्पित असतो. मान्यता आहे की या दिवशी देवी-देवता ओल्या रंगांनी होळी खेळतात. रंगपंचमीच्या दिवशी लोक रंग आणि गुलाल उडवतात. मान्यता आहे की, याने देवता प्रसन्न होतात आणि भाविकांना आशीर्वाद देतात. अशी देखील मान्यता आहे की या दिवशी हवेत उडणारा गुलाल तमोगुण आणि रजोगुणला समाप्त करतो आणि सतोगुणला वाढवते. यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

जन्मकुंडलीचे दोष दूरल होतील

मान्यता आहे की रंगपंचमीच्या दिवशी जर विधिवत देवाची पूजा केली तर त्याच्या कुंडलीतील सर्व मोठे दोष नष्ट होऊ शकतात. रंगपंचमी धनदायकही मानलं जातं, त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. अनेक ठिकाणी या सणाला श्री पंचमीच्या नावानेही ओळखलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करते वेळी त्यांना गुलाबाच्या फुलांचा हार, दोन वात असलेला दिवा आणि पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवावं. यानंतर त्यांच्याकडे घरावर कृपा ठेवण्यासाठी प्रार्थना करा.

महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम

महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

इंदूरची रंगपंचमी सर्वात हटके

रंग पंचमी देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण, मध्यप्रदेशातील इंदूरसारखी रंगपंचमी तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. या दिवशी शहरातील राजबाडा येथे लाखो लोक एकत्र येत मिरवणूक काढतात. याला गेर म्हणतात. या दरम्यान रामरज नावाचा गुलाल आकाशात उडवला जातो. शहरात सार्वजनिक अवकाश होता है.

Rang Panchami The Day Of Gods Holi Know The Date And Significance

संबंधित बातम्या :

Holika Dahan 2021 Upay : आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील अडचणी, ग्रह क्लेश होतील दूर, होलिका दहनला हे उपाय करा…

Holi 2021 | या 5 राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी ठरणार लकी, ग्रहांच्या शुभ योगायोगाने मोठा फायदा होणार

Lathmar Holi 2021 | बरसाना येथे लठमार होळी, कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.