रिझर्व बँकेने काढली 500 रूपयांची रामाचा फोटो असलेली नवी नोट? व्हायरल होत असलेल्या या फोटोमागचे नेमके सत्य काय?
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या 500 रूपयांच्या नोटेच्या फोटोवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एवजी प्रभू रामाचा फोटो दिसत आहे. याशिवाय जिथे लाल किल्ल्याचा फोटो आहे, तिथे अयोध्येत राम मंदिर बांधल्याचा फोटो आहे. प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा अभिषेक होत असताना, भगवान श्री राम आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या फोटोसह 500 रुपयांच्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रांसह 500 रुपयांच्या नोटांची नवीन मालिका जारी करणार आहे का? RBI 500 रुपयांची नोट (Shri Ram 500 Rupees Note) जारी करणार आहे का ? झपाट्यानं व्हायरल होत असलेल्या या फोटोमागे खरं खोटं काय आहे ते जाणून घेऊया.
महात्मा गांधींऐवजी श्रीरामाचे चित्र
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या 500 रूपयांच्या नोटेच्या फोटोवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एवजी प्रभू रामाचा फोटो दिसत आहे. याशिवाय जिथे लाल किल्ल्याचा फोटो आहे, तिथे अयोध्येत राम मंदिर बांधल्याचा फोटो आहे. प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
एकीकडे ही नोट व्हायरल होत आहे, मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटांच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आणि व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्वनी राणा म्हणाले की, अशी कोणतीही घोषणा केली गेली नाही किंवा आरबीआयने कोणतीही माहिती दिली नाही. ते म्हणाले की, ही खोटी बातमी आहे. आरबीआय 500 रुपयांच्या नव्या सीरिजच्या नोटा जारी करणार नाही.




राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रासह 500 रुपयांच्या नव्या नोटांची मालिका जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून 2022 मध्ये, आरबीआय सध्याच्या चलन आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रांसह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. तेव्हा आरबीआयने असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नसल्याचे सांगितले होते.