Vastu Tips: ही झाडे लावल्यानंतर घरात पैसाच पैसा येईल, जाणून घ्या कोणती आहेत ती रोपं

घर (Home) पंचमाहाभूतांनी बनलेले असते. वास्तु (Vastu) आणि ज्योतिष शास्त्रामध्ये घरात सुख-समृद्धीचे वातावरण राहण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत . घर बनवताना दिशेच्या ज्ञानासोबतच वास्तू आणि ज्योतिष शास्त्रामध्ये त्यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात, याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips: ही झाडे लावल्यानंतर घरात पैसाच पैसा येईल, जाणून घ्या कोणती आहेत ती रोपं
plant
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 2:14 PM

मुंबई : घर (Home) पंचमाहाभूतांनी बनलेले असते. वास्तु (Vastu) आणि ज्योतिष शास्त्रामध्ये घरात सुख-समृद्धीचे वातावरण राहण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत . घर बनवताना दिशेच्या ज्ञानासोबतच वास्तू आणि ज्योतिष शास्त्रामध्ये त्यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात, याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत.भरपूर पैसा, लक्झरी लाईफ, नवीन ठिकाणी फिरण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण सर्व लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेक वेळा मेहनत आणि सर्व प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रात अशाच काही प्रभावी टिप्स सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा येतो. वास्तुशास्त्रात अशा काही वनस्पती सांगण्यात आल्या आहेत, ज्या चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करतात.

ही दिशा निवडा

वास्तूनुसार, मनी प्लांट गॅलरी, बागेत किंवा इतर ठिकाणी ठेवताना, आग्नेय कोपरा या गोष्टीसाठी शुभ मानली जाते. असे म्हणतात की या दिशेला मनी प्लांट लावल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील सदस्यांमध्येही सकारात्मक ऊर्जा राहते. एवढेच नाही तर घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे मनी प्लांट लावताना योग्य दिशा जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ही रोपे निवडा

तुळस घराच्या पूर्वेकडील किंवा उत्तर-पूर्व दिशेने तुळशीची लागवड करावी. मान्यता आहे की जर तुळशी योग्य दिशेने लावली गेली तर ती घराचे वास्तू दोष दूर करते. शिवाय घराची नकारात्मकता देखील दूर होते. तुळशीपुढे नियमितपणे दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही.

मनी प्लांट वास्तूशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की ही वनस्पती जितक्या वेगाने पसरते, घरात अधिक संपत्ती आणि समृद्धी येते. ही घराच्या दक्षिण-पूर्व दिशेने ठेवली पाहिजे. यामुळे घरात सकारात्मकता येते आणि कुटुंब प्रमुखांच्या चिंता कमी होतात.

पारिजातक पारिजातकाचे झाड हे स्वर्गातील झाड म्हणून ओळखले जाते. त्याला कल्पवृक्ष असेही म्हणतात. त्याच्या फुलांचा सुगंध दूरदूरपर्यंत दरवळतो. मान्यता आहे की ज्या घरात ही वनस्पती वाढते तेथे सर्व देवतांचा आशीर्वाद राहातो. जर त्याचे फळ नियमितपणे देवाला अर्पित केले तर सोन्याचे दान केल्यासारखे पुण्य मिळते. घरात पैशांची कमतरता राहात नाही.

शमी घरात शमीचे झाड लावणे देखील शुभ आहे. ही वनस्पती लावण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते शनिदेवशी संबंधित असल्याची मान्यता आहे. शनिदेव कोणालाही राजा किंवा रंक बनवू शकतात. म्हणूनच लोक घरात या वनस्पतीची लागणे टाळतात. परंतु जर हे झाड मुख्य दाराच्या डाव्या बाजूला लावले असेल आणि त्याखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नियमितपणे लावला तर शनिदेव प्रसन्न होतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.