आज संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या पूजा मुहूर्त, विधी आणि चंद्रोदय वेळ
आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. अनेक लोकं संकष्टी चतुर्थी निमित्त उपवास करतात व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
Sankashti Chaturthi 2024 : आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेशाला समर्पित दिवस आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. तसेच अनेक लोकं आज संकष्टी चतुर्थी निमित्त उपवास करतात व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. संकष्टी चतुर्थी महिन्यातून दोनदा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाला येते. तर आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
गणदीप संकष्टी चतुर्थी तिथी १८ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होणार असून १९ नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या संध्याकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी ही तिथी संपणार आहे. तर चंद्रोदयाची वेळ आज संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी असेल. उदयतिथीनुसार १८ नोव्हेंबर म्हणजेच आज गणधीप संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे.
संकष्टी चतुर्थी पूजा विधी
जा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. उपवास धरुन गणेशाची पूजा करावी. पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी. गणपतीला उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे आणि फुले अर्पण करावीत. संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे. असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे.
श्लोक :
गणेशाय नमस्तुभ्यं, सर्व सिद्धि प्रदायक । संकष्ट हरमे देवं, गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥ कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश, अंगारकाय नमोऽस्तुते ॥
मंत्र :
ऊं श्री गणेशाय नमः
ऊं गण गणपतये नमो नमः
ऊं विकटमें विकटतमें गणपतिम् भजे
ऊं गणेश विद्ये नमोस्तुते
संकष्टी चतुर्थी महत्व
संकष्टी चतुर्थी हा गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. सनातन धर्मात सर्व देवी-देवतांसमोर गणपती बाप्पाची पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याशिवाय पूजेचा कोणताही विधी पूर्ण होत नाही. याशिवाय विवाहाशी संबंधित विधींमध्येही त्याची पूजा केली जाते म्हणून त्याला मंगलमूर्ती म्हणून ओळखले जाते. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थांचे नैवेद्य दाखवावे. या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. याने गणपती प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख- सौभाग्याचा आशीर्वाद देतात. मोदकाव्यतिरिक्त आपण लाडू, नारळाची वडी, खिरापत देखील अर्पित करु शकता. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडावा.