Lord Ganesha | प्रत्येक विघ्नाचे हरण करते संकटनाशक गणेश स्तोत्र, बुधवारी अवश्य करावे पठण

गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा. हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे. असे केल्याने सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामं होऊ लागतात. जर तुम्ही ते रोज करु शकत नसाल तर फक्त बुधवारी 11 वेळा वाचा. हे स्तोत्र वाचण्यापूर्वी गणपतीला सिंदूर, तुपाचा दिवा, अक्षता, फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करा. मग मनात त्यांचे चिंतन केल्यानंतर हे स्तोत्र वाचा

Lord Ganesha | प्रत्येक विघ्नाचे हरण करते संकटनाशक गणेश स्तोत्र, बुधवारी अवश्य करावे पठण
ganesha Puja
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 11:11 AM

मुंबई : बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की गणपती शुभ फळ देणारे देवता आहेत. मान्यता आहे की, प्रत्येक बुधवारी श्रद्धेने गणपतीची पूजा केल्यास घराची नकारात्मकता दूर होते आणि घरात शुभता येते. या व्यतिरिक्त कुंडलीत बुधची स्थिती मजबूत होते. ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते, ज्यांच्यावर गणपतीची कृपा आहे, त्याचे सर्व त्रास नष्ट होतात आणि सर्व काम पूर्ण होऊ लागतात.

जर तुम्हालाही गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा. हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे. असे केल्याने सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामं होऊ लागतात. जर तुम्ही ते रोज करु शकत नसाल तर फक्त बुधवारी 11 वेळा वाचा. हे स्तोत्र वाचण्यापूर्वी गणपतीला सिंदूर, तुपाचा दिवा, अक्षता, फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करा. मग मनात त्यांचे चिंतन केल्यानंतर हे स्तोत्र वाचा –

संकटनाशक गणेश स्तोत्र

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय:

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:

विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी पठण करा

संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण केल्यानंतर आपण गणपतीची आरती करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. जर तुम्हाला तुमची विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर 11 किंवा 21 बुधवार पर्यंत किंवा 11 किंवा 21 दिवसांसाठी या स्तोत्राचे पठण करण्याचा संकल्प करा. पहिल्या दिवशीच गणपतीसमोर आपली इच्छा प्रगट करा आणि ती पूर्ण करण्याची विनंती करा. त्यानंतर स्तोत्राचे पठण सुरु करा. लक्षात ठेवा की तुम्ही जे काही व्रत घेतले आहे ते नक्की पूर्ण करा. अन्यथा, तुम्हाला उलट परिणामाला सामोरे जावे लागू शकते.

संकष्टी चतुर्थी 2021 : तिथी आणि मुहूर्त

? गोधुली पूजा मुहूर्त – 6: 37 ते 7: 03

? चतुर्थी 25 ऑगस्ट रोजी – 4 वाजून 18 मिनिटांपासून सुरु होईल

? चतुर्थी 26 ऑगस्ट रोजी – 5 वाजून 13 मिनिटांनी संपेल

? ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4:37 ते 5:11

? अमृत ​​काळ – 3:48 ते 5: 28

? सूर्योदय – सकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी

? सूर्यास्त – सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Sankashti Chaturthi 2021 | संकष्टी चतुर्थी, भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी याप्रकारे पूजा करा

Janmashtami 2021 : भाग्य आणि यशासाठी या वास्तू टिप्स वापरून बासरीने सजवा आपले घर

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.