Shardiya Navratri 2021 | शारदीय नवरात्र, जाणून घ्या घट स्थापनेची पद्धत

या दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यासाठी कलश स्थापन केली जाते आणि घरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. यावेळी शारदीय नवरात्र गुरुवार 7 ऑक्टोबर सुरु होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी संपेल. दसऱ्याचा सण (Dussehra 2021) देखील याच दिवशी साजरा केला जाईल. यावेळी कलश स्थापन कशी करावी हे जाणून घ्या.

Shardiya Navratri 2021 | शारदीय नवरात्र, जाणून घ्या घट स्थापनेची पद्धत
Navratri
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 9:05 AM

मुंबई : श्राद्ध पक्षाला आता सुरुवात झाली आहे. तो 6 ऑक्टोबरपर्यंत असेल. त्यानंतर 7 ऑक्टोबरपासून शक्तीचे स्वरुप दुर्गा देवीची पूजा करण्याचे दिवस म्हणजेच नवरात्र सुरु होतील. अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा नऊ दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

या दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यासाठी कलश स्थापन केली जाते आणि घरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. यावेळी शारदीय नवरात्र गुरुवार 7 ऑक्टोबर सुरु होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी संपेल. दसऱ्याचा सण (Dussehra 2021) देखील याच दिवशी साजरा केला जाईल. यावेळी कलश स्थापन कशी करावी हे जाणून घ्या.

कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त (Kalash Sthapana Shubh Muhurat)

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापन केली जाते आणि या दिवशी अखंड ज्योत लावली जाते. यानंतर, हा कलश 9 दिवसांसाठी स्थापित राहतो. शेवटच्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते. यावेळी शारदीय नवरात्रीला कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 9:33 ते सकाळी 11:31 पर्यंत असेल. यानंतर दुपारी 3:33 ते संध्याकाळी 5:05 पर्यंत शुभ मुहूर्त असेल. परंतु तुम्ही सकाळी स्थापना करणे अधिक चांगले.

जाणून घ्या घट स्थापनेची पद्धत

कलश किंवा घटाची स्थापना करण्यासाठी सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुम्हाला देवीची पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करुन घ्या

यानंतर, एका पाटावर किंवा चौरंगावर नवीन लाल कापड घालून, दुर्गा देवीचे चित्र स्थापित करा आणि गणपतीचे स्मरण करा. पूजा कार्य सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी गणेशाकडे प्रार्थना करा. यानंतर सर्वप्रथम देवी दुर्गेच्या चित्रासमोर अखंड ज्योत लावावी.

यानंतर, मातीच्या भांड्यात माती घालावी. जव किंवा गहू त्यात पेरावा.

घरातील कलश व्यवस्थित साफ केल्यानंतर त्यावर कलाव बांधा. स्वस्तिक बनवा आणि कलशात थोडे गंगेचे पाणी घाला आणि त्याला पाण्याने भरा.

यानंतर, कलशमध्ये सुपारी, अक्षता आणि दक्षिणा घाला. नंतर कलशाच्या वर 5 आंबा किंवा अशोकाची पाने ठेवा आणि कलश बंद करा आणि त्याच्या झाकणावर धान्य भरा.

आता लाल ओढणीत एक नारळ गुंडाळा आणि धान्याने भरलेल्या झाकणावर ठेवा.

आता हा कलश मातीच्या भांड्याच्या मध्यभागी ठेवा. यानंतर, सर्व देवी -देवतांना आणि देवी दुर्गेचं आवाहन करा आणि नऊ दिवसांची पूजा आणि उपवास करण्याचा संकल्प घ्या.

यानंतर विधीवत पूजा सुरु करा.

शुभ मुहूर्ताचे महत्त्व समजून घ्या (Importance of Shubh Muhurat)

देवाची पूजा कोणत्याही वेळी केली जाऊ शकते, परंतु काही विशेष उपासनेत, शुभ मुहूर्त पाहिले जातात. असे मानले जाते की शुभ मुहूर्तात ग्रह आणि नक्षत्र शुभ परिणाम देण्याच्या स्थितीत असतात. अशा परिस्थितीत पूजेच्या वेळी कोणतेही काम करण्यात अडथळा येत नाही. शुभ मुहूर्तात तुम्ही ज्या इच्छेने उपासना यशस्वी मार्गाने करता तर तुम्हाला त्याचे चांगले परिणामही मिळतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हेच कारण आहे की बहुतेक ज्योतिषी शुभ मुहूर्तात कोणतेही काम करण्याची शिफारस करतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shardiya Navratri 2021 | शारदीय नवरात्र कधीपासून, जाणून घ्या कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.