Shravan 2022: श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारीच येतोय ‘प्रदोष व्रता’चा अत्यंत शुभ योग, जाणून घ्या महादेवाकडून इच्छित वर प्राप्त करण्यासाठी पूजेची पद्धत!

श्रावण महिन्यातील भगवान शंकराची उपासना अधिक शुभ आणि फळ देणारी असते. श्रावण महिन्यातील सोमवार आणि प्रदोष व्रत याला अधिक महत्व असल्याचे मानले जाते. जाणून घ्या, यंदा या विशिष्ट मुहूर्ताताबाबत संपूर्ण माहिती, आणि इच्छित वर प्राप्त करण्यासाठी पूजेची योग्य पद्धत.

Shravan 2022: श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारीच येतोय ‘प्रदोष व्रता’चा अत्यंत शुभ योग, जाणून घ्या महादेवाकडून इच्छित वर प्राप्त करण्यासाठी पूजेची पद्धत!
हादेवाकडून इच्छित वर प्राप्त करण्यासाठी पूजेची पद्धत!
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 2:53 PM

श्रावण महिना हा उपासना, जप, व्रत इत्यादीसाठी सर्वोत्तम (the best) मानला जातो. श्रावण महिन्यात सोमवार आणि प्रदोष एकत्र आल्यास, हा दिवस भगवान शंकराची उपासना (worship) अधिक फळ देणारी मानली जाते. हे दोन्ही व्रत सर्व प्रकारचे दु:ख आणि संकट दूर करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्यास लाभदायी मानले जातात. आज श्रावण महिन्यातील सोमवार आणि प्रदोष व्रत असा अत्यंत शुभ योग आहे. सोम प्रदोष व्रताची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि उपाय याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला असल्यास, तुम्हीही योग्य पद्धतीने पूजाअर्चा करून आपले इच्छित मनोकामना पूर्ण करू शकता. सनातन परंपरेत, भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत (Pradosh fast) पाळले जाते. जाणून घ्या, या विशिष्ट मुहूर्ताताबाबत संपूर्ण माहिती. इच्छित वर प्राप्त करण्यासाठी पूजेची योग्य पद्धत.

सोम प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त

श्रावणातील पहिल्या सोम प्रदोष व्रतामध्ये तीन शुभकार्ये होत असतात. यावर्षी ही पवित्र तिथी 26 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 04:15 पासून सुरू होऊन 06:46 पर्यंत असेल. दरम्यान, भगवान शंकराच्या उपासनेसाठी सर्वोत्तम वेळ आज म्हणजेच 25 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 07:17 ते 09:21 पर्यंत असेल.

सोम प्रदोष व्रताची उपासना पद्धत

आज श्रावण महिन्यात येणाऱ्या सोम प्रदोष व्रताचे पुण्य प्राप्त होण्यासाठी शिवभक्तांनी प्रथम स्नान करून ध्यान करून या व्रताला सुरूवात करावी. यानंतर आपल्या घरी किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला दूध, गंगाजल, फळे, फुले, अक्षीदा, बेलपत्र, शेंदूर, धोतऱयाचे फूल इत्यादी अर्पण करावे. यानंतर दिवसा भगवान शंकराचे स्मरण करून त्यांच्या मंत्राचा जप मनात करावा. हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीने दिवसाही झोपू नये, हे लक्षात ठेवा. पंचांगानुसार कोणत्याही दिवसाचा सूर्यास्त आणि रात्रीच्या संधिकाळाला प्रदोष म्हणतात. जो शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. अशा स्थितीत संध्याकाळी पुन्हा एकदा स्नान करून प्रदोष काळात विधिनुसार शिवाची पूजा, रुद्राभिषेक वगैरे करून जास्तीत जास्त लोकांना प्रसाद वाटप करावे.

हे सुद्धा वाचा

सोम प्रदोष व्रताचे फळ

हिंदू धर्मात भगवान महादेवाला कल्याणाची देवता मानले जाते. भगवान शंकराच्या कृपेने, श्रावण महिन्यातील सोमवारी आणि प्रदोष व्रत पाळल्यास भाविकांना सर्व प्रकारचे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. असे मानले जाते की, सोम प्रदोष व्रत केल्याने भक्तांची सर्वात मोठी इच्छाही पूर्ण होते आणि त्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद सदैव राहतो.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.