Shravan Month 2021 | आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात, पहिला श्रावणी सोमवारही आज, जाणून घ्या कुठल्या दिवशी शिवाला कुठली मूठ वाहावी
हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा म्हणजे श्रावण महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. आजपासूनच पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावणातील पहिला सोमवारही आज आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे.
मुंबई : श्रावण महिना (Shravan Month) म्हणजेच भगवान महादेवाचा महिना. हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा म्हणजे श्रावण महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. आजपासूनच पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावणातील पहिला सोमवारही आज आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे.
श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे. यावर्षी श्रावण महिना आजपासून म्हणजेच 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार असणार आहे. त्याचं महत्त्व, तिथी आणि कुठल्या श्रावणी सोमवारी कुठली मूठ शिवाला अर्पण करावी हे जाणून घेऊ
श्रावण महिन्याचे महत्त्व
श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
श्रावणी सोमवारी महादेवांना मूठ अर्पण करण्याची परंपरा
श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ आणि तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.
यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार असतील
? पहिला श्रावणी सोमवार – 09 ऑगस्ट 2021
? दुसरा श्रावणी सोमवार – 16 ऑगस्ट 2021
? तिसरा श्रावणी सोमवार – 23 ऑगस्ट 2021
? चौथा श्रावणी सोमवार – 30 सप्टेंबर 2021
? पाचवा श्रावणी सोमवार – 06 सप्टेंबर 2021
कुठल्या दिवशी शिवाला कुठली मूठ वाहावी?
? पहिला श्रावणी सोमवार – 9 ऑगस्ट 2021 – तांदूळ शिवमूठ
? दुसरा श्रावणी सोमवार – 16 ऑगस्ट 2021 – तीळ शिवमूठ
? तिसरा श्रावणी सोमवार – 23 ऑगस्ट 2021 – मूग शिवमूठ
? चौथा श्रावणी सोमवार – 30 ऑगस्ट 2021 – जव शिवमूठ
? पाचवा श्रावणी सोमवार – 6 सप्टेंबर 2021 – सातू शिवमूठ
श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी त्याचे काही खास नियम जाणून घ्याhttps://t.co/VRTzViGH2O#Shrawan2021 #sawansomvar #belpatra
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण