Shrawan 2022 : दिवसातून दोनदा समुद्राखाली जाणारं शिवमंदिर! कुठंय माहितीये? जाणून घ्या चकीत करणारी रहस्य
जगभरात भगवान शिवाचे अनेक चमत्कारीक मंदिरांबद्दल (miraculous temples of shiva) आपण ऐकले आहे. आज आपण अशाच एका चमत्कारीक शिव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. हे मंदिर फारच आश्चर्यकारक आहे. गुजरातमध्ये एक महादेवाचे मंदिर आहे. ज्याचा अभिषेक समुद्र देव करतात. हे मंदिर बडोदरा पासून 85 किलोमीटर अंतरावर जंबुसर तहसीलच्या कावी-कंबोई गावात आहे. स्तंभेश्वर (Stambheshwar Shiv Mandir) नावाचे […]

जगभरात भगवान शिवाचे अनेक चमत्कारीक मंदिरांबद्दल (miraculous temples of shiva) आपण ऐकले आहे. आज आपण अशाच एका चमत्कारीक शिव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. हे मंदिर फारच आश्चर्यकारक आहे. गुजरातमध्ये एक महादेवाचे मंदिर आहे. ज्याचा अभिषेक समुद्र देव करतात. हे मंदिर बडोदरा पासून 85 किलोमीटर अंतरावर जंबुसर तहसीलच्या कावी-कंबोई गावात आहे. स्तंभेश्वर (Stambheshwar Shiv Mandir) नावाचे हे मंदिर दिवसातून दोनदा समुद्रात लीन होते. थोड्या वेळाने ते पुन्हा दिसायला लागते. समुद्राच्या भरती आणि ओहोटीमुले असे होते. त्यामुळे समुद्रात ओहोटी असतानाच भाविकांना शिवलिंगाचे दर्शन घेता येते. भरतीच्या वेळी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते.
अरबी समुद्राच्या कळंबे किनाऱ्यावरील मंदिर
स्तंभेश्वर मंदिर अरबी समुद्राच्या कळंबे किनाऱ्यावर वसलेले आहे. या मंदिराचा शोध 150 वर्षांपूर्वी लागला होता. स्तंबेश्वर मंदिरात असलेल्या शिवलिंगाचा आकार 4 फूट उंच आणि 2 फूट व्यासाचा आहे. या प्राचीन मंदिराच्या मागे अरबी समुद्राचे अप्रतिम दृश्य दिसते. येथे येणाऱ्या भाविकांना माहिती पत्रकांचे वाटप केले जाते. ज्यामध्ये भरतीची वेळ लिहिली आहे. जेणेकरून भाविकांसोबत दुर्घटना होणार नाही.
स्तंबेश्वर मंदिराची पौराणिक कथा
शिवपुराणानुसार तडकासुर असुराने तपश्चर्येने भगवान शंकराला प्रसन्न केले होते. जेव्हा महादेव समोर प्रकट झाले तेव्हा त्याने वरदान मागितले की, त्याला शंकराच्या 6 दिवसांच्या मुलाकडूनच मारले जाऊ शकते. भोलेनाथने त्याला हे वरदान दिले. वरदान मिळताच ताडकासुराने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. देव आणि ऋषी महादेवाकडे मदतीसाठी गेले. शिव-शक्तीपासून पांढर्या पर्वताच्या तलावात जन्मलेल्या कार्तिकेयाला सहा मेंदू, चार डोळे आणि बारा हात होते. महादेवपुत्र कार्तिकेयाने वयाच्या सहा दिवसात तडकासुरचा वध केला अशी आख्यायिका आहे. कार्तिकेयाला जेव्हा कळले की तडकासुर हा शिवभक्त होता तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. भगवान विष्णूने कार्तिकेयाला वधाच्या ठिकाणी शिवालय बांधण्यास सांगितले. कार्तिकेयानेही तेच केले. सर्व देवांनी मिळून महिसागर संगम मंदिरात विश्वानंदक स्तंभाची स्थापना केली. जे आता स्तंबेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात स्वतः शिवशंभू वास करतात असे मानले जाते. त्यामुळे महासागर देवता त्यांचा जलाभिषेक करतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)