Shrawan Month 2021 | सर्वमनोकामना पूर्ण करणारा पवित्र श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय, जाणून घ्या
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना.
मुंबई : श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना. यावर्षी ही पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल (Shrawan Month 2021 from when Shrawan Mahina Starts).
महादेवाला अत्यंत प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातच कावड यात्रा निघते. श्रावण महिन्यातील सोमवारचेही विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातला सोमवार हा दिवस मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. श्रावण सोमवारी उपवास ठेवून महादेवाची मनोभावे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि महादेव आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात.
श्रावण महिन्याचे महत्त्व
श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
महादेव-गौरीची पूजा
श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ आणी तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.
यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार असतील
? पहिला श्रावण सोमवार – 09 ऑगस्ट 2021
? दुसरा श्रावण सोमवार – 16 ऑगस्ट 2021
? तिसरा श्रावण सोमवार – 23 ऑगस्ट 2021
? चौथा श्रावण सोमवार – 30 सप्टेंबर 2021
? पाचवा श्रावण सोमवार – 06 सप्टेंबर 2021
Kanwar Yatra 2021 | महादेवांना प्रसन्न करणारी कावड यात्रेची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या याचे महत्त्व आणि नियमhttps://t.co/IotjDb1AOW#KanwarYatra2021 #KanwarYatra #sawan
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 16, 2021
Shrawan Month 2021 from when Shrawan Mahina Starts
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lord Vishnu Birth | भगवान विष्णूंचा जन्म कसा झाला, गुरुवारी नारायणाची पूजा कशी करावी जाणून घ्या
Untold Story | संतोषी मातेचा जन्म कसा झाला, भगवान गणेशासोबत त्यांचं नातं काय?