Shukra Gochar 2025: नवीन वर्षात या तीन राशींचं नशीब उजळणार, इच्छा पूर्ण होणार
जन्मकुंडलीनुसार जानेवारी महिना अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपले राशी बदलत आहेत. त्यामुळे इतर राशींच्या लोकांवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. शुक्र गोचर २०२५ मुळे कोणाला फायदा होणार. कोणत्या तीन राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होणार जाणून घ्या.
Shukra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रात शुक्राला आनंद देणारा ग्रह मानले गेले आहे. शुक्र ग्रहाचा आशीर्वाद असेल तर व्यक्ती त्याच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त करतो. तसेच व्यक्तीचे उत्पन्न देखील कालांतराने वाढते. भौतिक सुख हवे असेल तर कुंडलीत शुक्र बळकट असावा लागतो असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं जातं. सध्या शुक्र हा मकर राशीत असून लवकरच तो आपली राशी बदलणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा 28 डिसेंबर रोजी राशी बदलणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11:40 वाजता शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. 4 जानेवारीला शतभिषा आणि 13 जानेवारीला पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शुक्र गोचर होईल. 28 जानेवारीला तो मीन राशीत प्रवेश करेल. ज्याचा परिणाम ३ राशींवर होणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊयात.
मेष
शुक्र हा मकर राशीतून कुंभ राशीत येत असल्याने मेष राशीच्या लोकांना याचा विशेष फायदा होईल. कारण मेष राशीच्या लोकांवर बृहस्पतिची कृपा होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या या राशीचे लोकं निरोगी राहतील. तसेच आर्थिक लाभही होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम मिळेल. तुम्हाला कोणाकडून महागडी भेटवस्तू मिळू शकते. भौतिक सुखही मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. त्यासाठी प्रवासाचा योग आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना देखील शुक्र गोचरचा फायदा होईल. शुक्राच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. तसेच या लोकांवर गुरु ग्रहाची कृपा वर्षाव होईल. व्यवसायात यश मिळेल. समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. इच्छित गोष्टी पूर्ण होतील. जुना मित्र भेटू शकतो. चंद्र आणि शुक्राची कृपा मिळवायची असेल तर प्रत्येक सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
मीन
शुक्र राशी बदलत असल्याने मीन राशीच्या लोकांना ही याचा विशेष लाभ मिळेल. या राशीच्या लोकांना शुक्र हा शुभ फल देतो. शुक्राच्या कृपेने मीन राशीच्या लोकांना भौतिक सुख प्राप्त होईल. जानेवारी महिन्यात मीन राशीच्या लोकांवर शुक्राची विशेष कृपा वर्षाव होईल. घरामध्ये शुभ कार्य घडेल. प्रवास करण्याचा योग येईल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली असेल.