Somvati Amavasya Jejuri: सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गंडावर भंडाऱ्याची उधळण, जेजुरी सजली
सोमवती अमावस्येनिमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरी दर्शनासाठी प्रचंड मोठया प्रमाणात गर्दी केली आहे.
पुणे :अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात (Somavati Amavasya Jejuri) साजरी होत आहे. या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज भंडाऱ्याची मुक्त उधळण होत आहे. कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष यात्रा बंद होती. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. यानंतर दोन वर्षांनी ही यात्रा भरली आहे. यात्रा भरल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळी 11 वाजता गडावरून पालखीही कऱ्हा स्नानासाठी निघाली. तसेच सायंकाळी 4 वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात आली.
भाविकांकडून प्रार्थना –
कोरोनाकाळात गडाचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. तसंच, यावर्षीची चैत्र पौर्णिमेची यात्राही रद्द झाली होती. त्यामुळे भक्तांना त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन घेता आले नाही. जगावरच कोरोनाचं संकट दूर होऊन, सगळेजण सुखी होवोत, अशी प्रार्थना भाविकांकडून करण्यात आली होती. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे सरकारने सर्व प्रकारची निर्बंध हटवली. यामुळे जेजुरी गडावर सोमवती अमावस्या निमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
सोन्याची जेजुरी
जेजुरी गडावर साजरा होणाऱ्या बहुरंगी-बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधीलकीचे अनोखे दर्शन इथे घडत असते. मात्र, कोरोनाकाळात शासनाकडून सार्वजनिक सणासुदीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणूनच जेजुरी गडावर हा शुकशुकाट होता. आता निर्बंध हटल्याने सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरीच्या गडावर सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. सोमवती अमावस्या असल्याने संपूर्ण दिवसभर राज्यभरातून भाविक आज कुलदेवाताच्या दर्शनाला गडावर जमले. सदानंदाचा जयघोष आणि भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण त्याने संपूर्ण गड परिसर जेजुरीतील रस्ते पिवळे धमक भंडाऱ्याने रंगले आहेत. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय. भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.