Pandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण

बारामती, तालुक्यातील पिंपळी येथे संत सोपान काका महाराज (Sopan kaka maharaj palkhi) यांच्या पालखीचे दुसरे मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडला. बारामतीचा मुक्काम आटपून पालखी सोहळा इंदापूरच्या दिशेने जात असताना पिंपळी या गावात पालखी न्याहारीसाठी विसावली,  यावेळी पालखी दाखल झाल्यानंतर पालखीला मेंढ्यांचे रिंगणाची परंपरा आहे. त्यानुसार मेंढ्यांचे रिंगण पार पडले.  मेंढ्यांचे रिंगण  पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली […]

Pandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 4:36 PM

बारामती, तालुक्यातील पिंपळी येथे संत सोपान काका महाराज (Sopan kaka maharaj palkhi) यांच्या पालखीचे दुसरे मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडला. बारामतीचा मुक्काम आटपून पालखी सोहळा इंदापूरच्या दिशेने जात असताना पिंपळी या गावात पालखी न्याहारीसाठी विसावली,  यावेळी पालखी दाखल झाल्यानंतर पालखीला मेंढ्यांचे रिंगणाची परंपरा आहे. त्यानुसार मेंढ्यांचे रिंगण पार पडले.  मेंढ्यांचे रिंगण  पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखीने इंदापूरच्या दिशेने प्रस्थान केले.  आज लासुर्णे येथे सोपान काका महाराज पालखीचा मुक्काम असणार आहे. सोपान काका महाराज सासवड ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्यातील बकऱ्यांचे पहिले गोल रिंगण बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे प[पार पडला होता.

इंदापूरात पार पडले तुकोबारायांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण

मजल दर मजल करीत वैष्णवांची वारी (Pandharpur Wari 2022) पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.  विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढऱ्याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले (Indapur Frist ringan sohala). उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज इंदापूर शहरातील सौ कस्तुरा बाई श्रीपती कदम या विद्यालयात आश्र्वाचे गोल रिंगण पार पडले,  रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊन पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी  पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या  सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळशीवाल्या महिला पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगणाभोवती उभ्या होत्या.

हे सुद्धा वाचा

पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा निमगाव केतकी येथील मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाला सकाळी 11,30 वाजता रिंगण सुरू झाले. पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला.  सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर विठू नामाचा गजर करीत वारकरी  खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला वारकरी  धावल्या नंतर विणेकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला. मानाचे अश्व धावण्यास सुरुवात झाली, एका पाठोपाठ एक असे अश्व धावले. अश्वधावण्याच्या अगोदर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या आश्वांची पूजा केली होती.

शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी..
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले....
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?.
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका.
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला.
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?.
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच...
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच....
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू.