राम मंदिर सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून विशेष तयारी, राज्यभर दुमदुमणार रामलल्लाचा जयघोष

रामलललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव हा राज्यभरात साजरा केला जाणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्धाटन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती राहाणार आहे. 

राम मंदिर सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून विशेष तयारी, राज्यभर दुमदुमणार रामलल्लाचा जयघोष
राम मंदिर अयोध्या Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 1:48 PM

विनायक डावरुंग, मुंबई : प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत राम मंदिराचं (Ram Mandir) स्वप्न साकारणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात हा दिवस उत्साहासारखा साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडूनदेखील विशेष तयारी करण्यात आली आहे. राज्यातसुद्धा हा सोहळा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सात दिवस मुंबईच्या प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. 15 जानेवारी ते 22  जानेवारी या दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्धाटन

रामलललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव हा राज्यभरात साजरा केला जाणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्धाटन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती राहाणार आहे.

राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर रामाची मोठी फ्रेम, राम मंदिराची प्रतिकृती आणि रोषणाई करणार आहे. अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलिया, रामायण मालिकेत रामाची भुमीका साकारणारे अरुण गोविल यांचीही विशेष उपस्थिती राहाणार आहे.

हे सुद्धा वाचा

हा सात दिवसीय सोहळा कसा असणार आहे ते आपण जाणून घेऊया

  • 15 जानेवारी – उद्घाटन
  • 16 जानेवारी – सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
  • 17 जानेवारी – अलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांची भजनाची संध्या
  • 18 जानेवारी – अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीत
  • 20 जानेवारी – रामायण मालिकेतील  अभिनेत्यांची उपस्थिती
  • 21 जानेवारी – कवी मनोज शुक्ला यांचा कार्यक्रम
  • 22 जानेवारी – पद्मश्री सुरेश वाडकर यांचे कार्यक्रम

अशाप्रकारे महाराष्ट्रातही रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. यासाठी कार्यकर्ते आणि पदाधीकारीही तयारीला लागले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.