Spritual: मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व
कासव (Turtle) हा जीव सत्त्व गुण प्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर (Temple) कासव असतो. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे. कासव हे श्रीविष्णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते अशी मान्यता आहे. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर […]
कासव (Turtle) हा जीव सत्त्व गुण प्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर (Temple) कासव असतो. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे. कासव हे श्रीविष्णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते अशी मान्यता आहे. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली होती. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असतो.
कासवाचे गुण
- कासवाला 4 पाय , शिर व शेपटी अवयव असतात . तसेच माणसाला 6 शत्रु असतात. काम, क्रोध, मोह ,माया लोभ आणि मत्स
- कासव हे नम्रतेने नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण नम्रतेने नतमस्तक व्हावे
- कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.
- कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.
- कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे.
कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थ
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे.
आपणास माहिती आहे का कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दुध पाजत नसते तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते. त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हाव्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.
कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)