Success : डर के आगे जीत है, जाणून घ्या कशी करावी भीतीवर मात !
जीवनात तुम्हाला एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती हीच तुमची कमजोरी ठरत असेल , तर त्यावर विजय मिळवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे 5 मंत्र जाणून घेण्यासाठी, जरूर वाचा हा लेख.
जीवनात प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती (fear) वाटत असते. कोणी अंधाराला (darkness)घाबरतं तर कोणाला परीक्षेची भीती वाटते. खरं सांगायचं तर, भीती वाटणे हा मनुष्याच्या जीवनाचा (fear is part of human’s life) एक भाग आहे. मात्र याच भीतीचे रुपांतर एखाद्या सवयीत झाल्यास ती त्या व्यक्तीची कमजोरी किंवा दुर्बलता ठरते. आणि तीच भीती त्या व्यक्तीच्या अपयशासाठी ( reason for failure) कारणीभूत ठरू शकते. जर तुम्हालाही अशा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि ती तुमच्या यशाच्या आड येत असेल तर ती भीती दूर करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठीचे 5 मंत्र जाणून घ्या. कारण, असं म्हणतात की, ‘ डर के आगे जीत है… ‘
भीतीवर मात करण्यासाठी वाचा हे 5 मंत्र –
- आयुष्यात भीती ही अनेकदा आपल्या विचारांमुळे निर्माण होते. उदाहरणार्थ – आपण असा विचार केला किंवा गृहीत धरले की एखादी गोष्ट आपण कधीच करू शकत नाही म्हणजे नाहीच.. हा असा विचार करणे म्हणजेच आपल्या मनातील भीती असते.
- जर तुम्हाला तुमच्या मनातील भीतीवर विजय मिळवायचा असे तर घरी बसून सतत त्याबद्दल विचार करू नका. उलट त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या कामात पूर्णपणे लक्ष द्या, एकाग्रचित्ताने ते काम करा.
- जर तुम्ही तुमच्या मनातील भीतीवर विजय मिळवला नाहीत, तर ती भीती तुमच्या मानगुटीवर बसेल, तुमच्यावर विजय मिळवेल.
- आयुष्यात भीतीला कधीही तुमच्या जवळ येऊ देऊ नका. एखाद्या गोष्टीची भीती वाटायला सुरूवात झाली, तर त्याविरुद्ध लढा द्या आणि मनातून ती भीती काढून टाका. तात्पर्य काय तर भीतीपासून दूर पळू नका तर त्याविरोधात उभं राहून खंबीरपणे लढा आणि भीती पळवून लावा.
- एखादं संकट किंवा भीतीदायक गोष्ट दूर असेपर्यंत त्याबद्दल भीती वाटणे ठीक आहे. मात्र जेव्हा ती गोष्ट तुमच्या समोर येईल, तेव्हा मनात कोणतीही शंका-कुशंका न ठेवता त्या भीतीवर मात करण्याचा उपाय शोधला पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकाल.