Sleep Tips | रात्री झोपताना विचारांचं काहूर माजतं?, हे उपाय करुन पाहा
दिवसभराचा थकवा दुर करण्यासाठी आपण रात्री शांत झोपतो. झोपेत आपल्या शरीराच्या सर्वच क्रिया संथगतीने होतात. पण आपल्या शरीरीची खरी वाढ झोपेमध्येच होत असते. आपले केस, नखं हे सर्व रात्री झोपेतच होते. वेदांमध्येही झोपेला विषेश महत्त्व दिले आहे.
मुंबई : दिवसभराचा थकवा दुर करण्यासाठी आपण रात्री शांत झोपतो. झोपेत आपल्या शरीराच्या सर्वच क्रिया संथगतीने होतात. पण आपल्या शरीरीची खरी वाढ झोपेमध्येच होत असते. आपले केस, नखं हे सर्व रात्री झोपेतच होते. वेदांमध्येही झोपेला विषेश महत्त्व दिले आहे. पण अती विचांरांमुळे झोप लागत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरकडे जावून त्यांवर गोळ्या चालू करतो पण या गोळ्या शरीरासाठी खूप खातक असतात. या समस्येवर शास्त्रांमध्ये साधा सरळ उपाय सांगितले आहे. हा उपाय म्हणाजे मंत्रांचे पठण.
हिंदू धर्मात वैदिक मंत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. मंत्र पठण करताना आपल्या शरीरातून एक प्रकारचा आवाज निर्माण होतो. त्याचा आपल्या शरिरावर सकारात्मक परिणाम होतो. मंत्रांच्या प्रभावाने आपल्या शरीरासोबतच ध्वनी लहरी देखील आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक उर्जेने भरतात.
पुराणात ध्वनी या गोष्टीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. पुराणकाळात पाऊस पाडण्यापासून दिवा लावण्यापर्यंत अनेक गोष्टीचे पुरावे आपल्याकडे आहेत. अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक तानसेन जेव्हा गाणे गायचे तेव्हा पाऊस पडायचा असे सांगण्यात येते. ध्वनी या गोष्टीमध्ये खूप ताकद असते. याचाच उपयोग आपण शांत झोप मिळवण्यासाठी ही करु शकतो. औषधांऐवजी असे काही मंत्र आहेत, जे रात्री झोपण्यापूर्वी वाचले तर झोपही येते आणि आयुष्यातील सर्व समस्याही दूर होतात.
आयुर्वेदात शांत झोपण्यासाठी अनेक मंत्र सांगण्यात आले आहेत. चांगल्या झोपेमुळे, एखादी व्यक्ती आपल्या शरीराची उर्जा योग्यरित्या सक्रिय करण्यास सक्षम असते. अशा स्थितीत जर तुम्हाला रात्री झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा तुमची झोप भंग पावत असेल तर तुम्ही या मंत्राचा वापर करु शकता.
जीवनात या मंत्रांचा जप करा
– “हर हर मुकुन्दे ”
हा मंत्र आपले मन शांत करून चांगली झोप घेण्यास मदत करतो. हे मंत्र सर्व आंतरिक भीती काढून टाकण्यास आणि मनाला मानसिक अडथळ्यांमधून बाहेर काढण्यास मदत करतात.
– “अंग संग वाहेगुरु ”
हा मंत्र मन आणि शरीराला आराम देतो. यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होईल.
-ॐ भुरभुव: स्व: त्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। अच्युतम् केशवम् विष्णुम् हरिम् सोम जनार्दनम् । हसम नारायणम कृष्णम् जप
-राम शिव हरे राम शिव राम राम शिव हरे.
हे सर्व मंत्र रात्रीच्या शांत झोपेसाठी फायदेशीर आहेत. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर या मंत्रांचा जप करु शकता.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
इतर बातम्या :
Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा
Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…
Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा