सूर्य देवाचा जन्म कसा झाला?, जाणून घ्या पौराणिक कथा
हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्य देव मानले जातात (Surya Dev Birth Story). ज्योतिष शास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे.
मुंबई : हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्य देव मानले जातात (Surya Dev Birth Story). ज्योतिष शास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे. ज्योतिषनुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. हा मनुष्याच्या जीवनात मान-सन्मान, पिता-पुत्र आणि यशकारक मानला जातो. ज्योतिषनुसार सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रकारे बारा राशींमध्ये सूर्य एक वर्षात आपलं चक्र पूर्ण करतो (Surya Dev Birth Story Know The Pouranik Katha).
सूर्याला आरोग्य देवता मानलं जाते. सूर्य प्रकाशानेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे. सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो. पण, काय तुम्हाला माहिती आहे का सूर्य देवाचा जन्म कसा झाला होता. जाणून घ्या सूर्य देवाच्या जन्माची पौराणिक कथा…
सूर्य देवाच्या जन्माची पौराणिक कथा –
पौराणिक कथेनुसार, पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं. त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले. त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ॐ निघाला जो सूर्याच्या तेज रुपी सूक्ष्म रुप होता. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले जे ॐ च्या तेजात एकाकार झालेत.
ही वैदिक तेजचं आदित्य आहे जो विश्वाच्या अविनाशाचं कारण आहे. हा वेद स्वरुप सूर्यच सृष्टीच्या उत्पत्ती, पालन आणि संहारचं कारण आहे. ब्रह्माजींच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला अकत्र करुन स्वल्प तेजाला धारण केलं.
सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजींचे पुत्र मरीची झाले ज्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह अदितिसोबत झाला. अदितिने घोर तपस्या करुन भगवान सूर्याला प्रसन्न केलं. ज्यांनी तिच्या ईच्छापूर्तीसाठी सुषुम्ना नावाची किरणेच्या रुपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला. गर्भावस्थातही अदिति चान्द्रायण सारखे कठीण व्रतांचं पालन करत होत्या.
तेव्हा ऋषी राज कश्यप यांनी क्रोधित होऊन अदितिला म्हटलं की, ‘तू याप्रकारे उपवास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेतेय’ (Surya Dev Birth Story Know The Pouranik Katha)
हे ऐकून देवी अदितिने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढलं जो आपल्या अत्यंत दिव्य तेजाने प्रज्वलीत होत होता. भगवान सूर्य बाळाच्या स्वरुपात त्या गर्भातून प्रकट झाले. अदितिला मारिचम-अन्डम म्हटलं जाण्याचं कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाला. ब्रह्मपुराणमध्ये अदितिच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटलं गेलं.
जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?https://t.co/Vc59mzNrAO#Mahabharata #Mahadev #Pandav
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
Surya Dev Birth Story Know The Pouranik Katha
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त…
‘हे’ संकेत दिसले तर समजा तुमच्यावर शनिचा प्रकोप, ‘या’ उपायांनी होणार बचाव…