Last Solar Eclipse of 2021 | सूर्य ग्रहण काळात गर्भवती महिलांनो ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका
4 डिसेंबर 2021 रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहण या गोष्टीला घेऊन अनेक गोष्टी प्रचलित आहेत. पुराणात या काळाला अशुभ काळ मानला गेला आहे. ग्रहणाचे धार्मिक महत्त्व विचारात घेता भारतात सूर्यग्रहणाबाबत अनेक समजुती आहेत.
मुंबई : 4 डिसेंबर 2021 रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहण या गोष्टीला घेऊन अनेक गोष्टी प्रचलित आहेत. पुराणात या काळाला अशुभ काळ मानला गेला आहे. ग्रहणाचे धार्मिक महत्त्व विचारात घेता भारतात सूर्यग्रहणाबाबत अनेक समजुती आहेत. खगोल शास्त्रात मात्र ही एक खगोलीय घटनाच आहे. ज्यामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येते आणि अवकाशात कंकणासारखी प्रतिमा तयार होते.
कुठून दिसणार ग्रहण सूर्यग्रहण (सूर्यग्रहण 2021) अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. कंकणकृती दुपारी ३:२५ वाजता सुरू होईल आणि ४:५९ पर्यंत चालेल. सायंकाळी 6.41 वाजता समाप्ती होईल. चला तर मग जाणून घेऊया ग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये.
गर्भवती महिलांसाठी नियम जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हे गर्भवती महिलांसाठी शुभ मानले जात नाही. अशा परिस्थितीत गरोदर महिलांनी ग्रहणकाळात विशेष काळजी घ्यावी लागते. ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये अशी मान्यता आहे. वास्तविक पाहता, ग्रहण नकारात्मक ऊर्जा सक्रिय करते, ज्याचा परिणाम गर्भवती महिलांवर आणि त्यांच्या मुलावर होतो. अशा स्थितीत या काळात महिलांनी देवपूजा करावी.
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे. ?ग्रहणाच्या वेळी घरातच राहावे.
?एखाद्याने झोपू नये. ग्रहणाच्या काळात वातावरण खराब झालेले असते एक प्रकारची नकारत्मकता असते. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी प्रार्थना करावी किंवा महामृत्युंजय मंत्र, विष्णु मंत्र आणि सूर्य मंत्र यांसारख्या मंत्रांचा जप करावा.
?सूर्यग्रहणाच्या आधी आणि नंतर आंघोळ करावी.
?सूर्यग्रहणाच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी खिडक्या जाड पडद्यांनी झाकावे
?सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न, स्वयंपाक इत्यादी कधीही सेवन करू नये.
?तीक्ष्ण वस्तू चुकूनही वापरू नये.
? सूर्याकडे पाहणे टाळावे.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
इतर बातम्या
चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत