Surya Grahan 2022 : सुर्य ग्रहणानंतर करा हे उपाय, तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडेल
सुर्यग्रहण संपल्यानंतर प्रत्येकाने अंधोळ करायला पाहिजे. त्यानंतर माता महालक्ष्मीला लाल रंगाचं पुष्प अर्पण करा. पार्थना करा की मला माझ्या कुटुंबियांना अर्थ प्रात्पी झाली पाहिजे.त्याचवेळी ही सुध्दा प्रार्थना करा की आमच्यावरती कायम लक्ष राहू दे.
मुंबई – सुर्य ग्रहणाला (Surya Grahan)आपल्याकडे खास महत्त्व आहे. त्या दिवशी आपल्या देशात अधिक पूजा केली जाते. यावर्षी सुर्यग्रहण अगदी जवळ आलं आहे. 30 एप्रिलला सुर्यग्रहण असेल. हे सु्र्यग्रहण 30 एप्रिलच्या (April) मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल, साधारण पहाटेच्या चार वाजून सात मिनिटांपर्यंत सुर्यग्रहण राहिल. हे अत्यंत कमी प्रमाणातलं सुर्यग्रहण आहे. असं मानलं जात की सुर्यग्रहणाच्या दिवशी केलेले उपायांचा अधिक फायदा देखील होतो. तुम्ही सुर्यग्रहणानंतर आर्थिक प्राप्तीसाठी उपाय केले तर त्याचा फायदा होतो. त्यादिवशी खास उपाय केल्याने घरात पैशांची (money) कधीचं कमतरता जाणवत नाही.
अंधोळ ध्यान आणि पूजा
सुर्यग्रहण संपल्यानंतर प्रत्येकाने अंधोळ करायला पाहिजे. त्यानंतर माता महालक्ष्मीला लाल रंगाचं पुष्प अर्पण करा. पार्थना करा की मला माझ्या कुटुंबियांना अर्थ प्रात्पी झाली पाहिजे.त्याचवेळी ही सुध्दा प्रार्थना करा की आमच्यावरती कायम लक्ष राहू दे.
संकट दूर होण्यासाठी हे करा
ग्रहणानंतर कमळाच्या फुलाला कुंकु लावा. त्यानंतर त्या कमळाच्या फुलाला पाण्यात टाका. त्याचवेळी परमेश्वराला प्रार्थना करा की, संपुर्ण कुटुंबियांचं दुख दूर झालं पाहिजे. आमच्या घरात सुख नांदलं पाहिजे. कधी आमच्या घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ नये, त्यासाठी आमच्यावर कृपा राहू दे.
करा हे उपाय
या दिवशी आपण एका भांड्यात पीठ घ्या. एका भांड्यात तांदूळ घ्या. एका भांड्यात उडिदाची डाळ घ्या आणि काही पैसे हातात घेऊन त्यांची ध्यानधारणा करा. ईश्वराकडे मागणी करा की, आमच्या कुटुंबामध्ये कधीही दुख येऊ नये.
तुळसीचं पुजन करा
तुमच्या कुटुंबियांसोबत भगवान श्रीहरी आणि माता तुळशीच्या नावाचा जप करा. तुळशीच्या नावाचा मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने महालक्ष्मीची कायम कृपा राहते.