Numerology : या मूलांकाच्या लोकांची कशी असते आर्थिक स्थिती ? पटापट जाणून घ्या..
Most Powerful Numbers in Numerology : अंकशास्त्रात असे मूलांक नंबर असलेल्या लोकांबद्दल सांगितले आहे जे वाढत्या वयाबरोबर खूप श्रीमंत होतात. ज्योतिष शास्त्रानुसार हे लोक खूप भाग्यवान असतात.

मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज. उदा – तुमचा जन्म 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 असेल, 7+2 = 9, म्हणून तुमचा मूलांक असेल 9. मूलांकानुसार अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 क्रमांकापर्यंतच्या लोकांचे व्यक्तिमत्व, करिअर आणि भविष्य स्पष्ट केले आहे.
लहानपणापासून असतात लकी
प्रत्येक मूलांकाची स्वतःची खास गोष्ट असते. अशा परिस्थितीत, आज आपण मूलांक संख्या असलेल्या अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत जे लहानपणापासून भाग्यवान असतात आणि वाढत्या वयानुसार श्रीमंत होतात.
वाचा : बायकोला तळहाताच्या फोडासारखं जपतात ‘या’ मूलांकाचे पती
नंबर 1 मूलांक वाले लोक
अंकशास्त्रात, 1 हा क्रमांक, अतिशय शक्तिशाली संख्या मानली जाते. वास्तविक ही सूर्यदेवाची संख्या मानली जाते. सूर्य देव हा ग्रहांचा राजा आहे आणि तो आत्मविश्वास, आरोग्य, सन्मान आणि कीर्ती देणारा आहे.
पद-प्रतिष्ठा
या गुणांमुळे मूलांक 1 चे लोक अतिशय हुशार आणि प्रत्येक कामात निपुण असतात. ते उच्च स्थान आणि प्रतिष्ठा प्राप्त करतात आणि वाढत्या वयानुसार अधिकाधिक श्रीमंत होतात.
हेही वाचा : या मूलांकाच्या सुना कशा निघतात? जाणून घ्या पटापट
प्रगतीही होते
एवढंच नव्हे तर मूलांक 5 असलेले लोकही मोठे व्यापारी बनतात. तसेच ते जीवनात खूप प्रगती करतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती असतात आणि ते जमीन आणि मालमत्तेचे मालक बनतात.
श्रीमंत होतात
अंकशास्त्रात 6 हा अंक खूप शुभ मानला जातो. मूलांक 6 असलेले लोक सुंदर, आकर्षक आणि खूप श्रीमंत असतात. बरेच लोक त्यांच्याकडे ओढले जातात, आकर्षित होतात. या राशीच्या लोकांना विलासी जीवन जगण्याची आवड असते आणि त्यांनाही असे जीवन जगायला मिळतं.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)