Surya Grahan 2022 | या दिवशी होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण, गरोदर महिलांसाठी महत्त्वाची माहिती
हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे.
मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. आकाशात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो. पुराणानुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही ग्रहण होणार आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र (Moon) व सूर्य यांची युती असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. 2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल, शनिवारी होणार असून. भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील. मात्र, भारतातील हे पहिले सूर्यग्रहण अंशत: असेल हे सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये पाहता येणार आहे.
ग्रहण काळात काय करावे
तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात टाका, जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू नये आणि ग्रहणानंतर त्यांचे सेवन करता येईल. घराचे मंदिर झाकून ठेवा. यादरम्यान मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात. ग्रहणकाळात जास्तीत जास्त वेळ देवपूजेत घालवावा. ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. विशेषत: तसेच या काळात दान करणे देखील शुभ मानले जाते.
ग्रहण काळात हे काम करू नका
ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये. ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे. सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका, कापण्याचे आणि सोलण्याचे काम करू नका किंवा अन्न खाऊ नका. विशेषत: गरोदर महिलांनी यावेळी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, या वस्तू हातात घेऊ नये. ग्रहण काळात प्रवास करणे टाळावे.
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे.
?ग्रहणाच्या वेळी घरातच राहावे.
?एखाद्याने झोपू नये. ग्रहणाच्या काळात वातावरण खराब झालेले असते एक प्रकारची नकारत्मकता असते. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी प्रार्थना करावी किंवा महामृत्युंजय मंत्र, विष्णु मंत्र आणि सूर्य मंत्र यांसारख्या मंत्रांचा जप करावा.
?सूर्यग्रहणाच्या आधी आणि नंतर आंघोळ करावी.
?सूर्यग्रहणाच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी खिडक्या जाड पडद्यांनी झाकावे
?सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न, स्वयंपाक इत्यादी कधीही सेवन करू नये.
?तीक्ष्ण वस्तू चुकूनही वापरू नये.
? सूर्याकडे पाहणे टाळावे.
संबंधीत बातम्या :
20 April 2022 | 20 एप्रिल 2022, बुधवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
अंगारकी चतुर्थी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळ्यात मांदियाळी
Vastu | चुकूनही दुसऱ्याच्या या गोष्टी वापरू नका, वाईट काळ सुरु झालाच म्हणून समजा