कुणाचे बेशिस्त वर्तन तर कोणी मारला रोख रक्कमेवर डल्ला, तुळजाभवानी देवीच्या 7 पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई
प्रशासकीय कामात अडथळा आणणे, पाळी नसताना देवीच्या गाभाऱ्यात पुजारी (Pujari) यांनी अनधिकृत प्रवेश करणे यासह भविकांनी देवीस अर्पण करण्यासाठी दिलेली सोन्याची नथ व रोख रकमेवर डल्ला मारल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानने कारवाई केली आहे.
मुंबई : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tuljabhavani) मातेच्या मंदिरात बेशिस्त वर्तन,कर्मचारी यांना शिवीगाळ करीत प्रशासकीय कामात अडथळा आणणे, पाळी नसताना देवीच्या गाभाऱ्यात पुजारी (Pujari) यांनी अनधिकृत प्रवेश करणे यासह भविकांनी देवीस अर्पण करण्यासाठी दिलेली सोन्याची नथ व रोख रकमेवर डल्ला मारल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानने कारवाई केली आहे. भोपे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे तुळजापूर शहर (Tuljapur City) प्रमुख सुधीर किसनराव कदम – परमेश्वर यांच्यासह 4 पूजाऱ्यांना प्रत्येकी 6 महिने मंदिर प्रवेश बंदी तर इतर 3 पूजाऱ्यांना प्रत्येकी तीन महिने मंदिर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. पुजारी सुधीर कदम यांना 2 वेगवेगळ्या प्रकरणात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
नक्की काय आहे प्रकरण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात देवीच्या 7 पूजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे त्यांच्या कार्यकर्ते सोबत दुपारी दीडच्या सुमारास देवीच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी सुरक्षा निरीक्षक यांना सुधीर कदम व इतर 3 पुजारी चोपदार दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते. चावी न दिल्यानंतर त्यांनी खासदार साहेब यांना कुंकू लावायचे आहे त्यामुळे चावी द्या म्हणून सुरक्षारक्षक यांना दमदाटी करीत चावी घेऊन कुलूप उघडले. त्यानंतर या सर्वांनी खासदार यांना आत घेऊन गेले ज्यामुळे मंदिर गाभाऱ्यात व चोपदार दरवाजा येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली.शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन पुजा केल्यामुळे 4 पूजाऱ्यांवर करावाई करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याआधारे या 4 जणावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने मंदिर संस्थानचे तहसीलदार यांनी हे आदेश काढले आहेत .
कोणाला किती शिक्षा तुळजाभवानी मंदिरातील पुजारी सुधीर कदम- परमेश्वर, विनोद सुनील कदम – सोंजी, गजानन किरण कदम व सचिन वसंतराव अमृतराव या 4 पूजाऱ्यावर देऊळ कवायत कलम 24 व 25 प्रमाणे पुढील 6 महिन्यासाठी मंदिर प्रवेश बंदी घातली आहे.असून मंदिर प्रवेश बंदी पुढील 12 महिन्यापर्यंत कायम का करण्यात येऊ नये याचा खुलासा 7 दिवसात खुलासा सदर करावा असे आदेश दिले आहेत.
पुजारी सागर गणेश कदम, ओंकार हेमंत इंगळे व अरविंद अण्णासाहेब भोसले या 3 पूजाऱ्यांना प्रत्येकी 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली आहे तर प्रवेशबंदी पुढील 6 महिने कायम का करण्यात येऊ नये याचा खुलासा 7 दिवसात मागितला आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करून धमकी देणे, प्रशासकीय अडथळा यासह, गोंधळ घालणे, दर्शन रांगेत भाविक घुसवून गोंधळ घातल्याने अरविंद भोसले व ओंकार इंगळे यांना 3 महिने प्रवेश बंदी घातली आहे.
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti | भविष्याचा तुमचा आधार भक्कम करा, तुमच्या पाल्यांना योग्य संस्कार द्या
24 February 2022 Panchang | 24 फेब्रुवारी 2022, गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ