पैशांच्या समस्येने त्रस्त झालात, उत्पन्न एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, आयुष्यात येणार नाही दु:ख

उत्पन्ना एकादशी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी काही विशेष कार्य केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो. तसेच आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

पैशांच्या समस्येने त्रस्त झालात, उत्पन्न एकादशीच्या दिवशी करा 'हे' उपाय, आयुष्यात येणार नाही दु:ख
उत्पन्न एकादशी
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 2:05 PM

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी उत्पन्ना एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि कुटुंबात सुख-समृद्धी राहते. असे मानले जाते की उत्पन्ना एकादशीला भगवान विष्णूची पूजा करणे आणि काही नियमांचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात संपत्तीची कमतरता राहत नाही. जी लोकं आर्थिक अडचणींनी त्रस्त आहेत, हे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या दूर होतात.

पंचांगानुसार उत्पन्ना एकादशीचे व्रत २६ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला सकाळी ०१ वाजून १ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ०३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत चालणार आहे. अशा तऱ्हेने उदयतिथी तिथीनुसार २६ नोव्हेंबर ला उत्पन्ना एकादशीचे व्रत केले जाणार आहे.

उत्पन्ना एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक फायदे मिळतात. या एकादशीला काही खास उपाय केले जातात, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येऊ शकते आणि जीवनातील पैशांची कमतरता दूर होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

करा हे खास उपाय

– उत्पन्ना एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही विष्णूजींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर दिवा लावून फुले अर्पण करा. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा. तुळस अत्यंत पवित्र मानली जाते. उत्पन्ना एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी तुळशीला फुले आणि गोडाचा नैवैद्य देखील अर्पण करू शकता.

-या दिवशी दिवसभर उपवास केल्याने मन शांत आणि शुद्ध होऊ शकते. तसेच तुम्ही एक वेळचे जेवण घेऊ शकता किंवा फळे घेऊ शकता. या दिवशी दान केल्यास पुण्य प्राप्त होते. तुम्ही एखाद्या गरजूव्यक्तीला अन्न, कपडे किंवा पैसे दान करू शकता. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो.

– शालिग्राम (तुळस) हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. तुम्ही शालिग्रामला गंगेच्या पाण्याने स्नान करून पिवळे कपडे अर्पण करा. संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावून लक्ष्मी-नारायणाची पूजा करावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धीचा वास राहतो, असे मानले जाते.

– एकादशीला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून स्नान करावे. आंघोळीनंतर पिवळे कपडे परिधान करा. असे केल्याने व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा कायम राहील, असे मानले जाते. करिअर किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर उत्पन्ना एकादशीच्या दिवशी दुधात केसर घालून भगवान विष्णूचा अभिषेक करावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

– जर कोणाला लग्नाशी संबंधित समस्या येत असतील तर त्यांनी उत्पन्ना एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना केशर, हळद किंवा चंदनाने गंध लावा.तसेच श्रीहरीला पिवळी फुले अर्पण करा. असे केल्याने लवकर लग्न होते आणि कर्जमुक्तीसाठी उत्पन्ना एकादशीला रावी वृक्षाला (रबर वृक्ष ) जल अर्पण करावे आणि संध्याकाळी रावी वृक्षाखाली दिवा लावावा. हे उपाय केल्याने कर्जाशी लढत असलेल्या व्यक्तीची लवकरच कर्जमुक्ती होईल.

मार्गशीर्ष महिन्यात उत्पन्ना एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीची आरती करावी. असे केल्याने व्यक्तीला नेहमी पैशाची कमतरता भासत नाही आणि जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.