Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा…
हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहेत जी वेळेशी जोडून पाहिली जातात. उदाहरणार्थ, काही काम सूर्योदयानंतर आणि काही काम सूर्यास्तापूर्वी करण्याचा सल्ला दिला जातो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणा आहोत की सूर्यास्तानंतर कोणते काम करु नये (Things To Avoid After Sunset)
मुंबई : अशी अनेक कामे आहेत, ज्याची वेळ ठरलेली आहे. आजी-आजोबांच्या काळापासून ती कामे विशिष्ट वेळी करण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहेत जी वेळेशी जोडून पाहिली जातात. उदाहरणार्थ, काही काम सूर्योदयानंतर आणि काही काम सूर्यास्तापूर्वी करण्याचा सल्ला दिला जातो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणा आहोत की सूर्यास्तानंतर कोणते काम करु नये (Things To Avoid After Sunset) –
मान्यतेनुसार, असे केल्यास घरामध्ये रोग, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा नाराज होते.
1. नखे आणि केस कापणे
सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नये. एवढेच नाही तर दाढी करणे देखील टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते. असे केल्याने घरावरील कर्ज वाढते असेही मानले जाते.
2. झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे
असे मानले जाते की सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करु नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये, असा समज आहे. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर झाडे देखील झोपतात.
3. कपडे धुणे आणि वाळवणे
सूर्यास्तानंतर कपडे धुण्यासही मनाई आहे. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो.
4. अन्न उघडे ठेवणे
सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे, जर त्यावर झाकले नाही तर नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे तुम्ही ते खाल्ल्यास आजारी पडू शकता.
5. अंत्यसंस्कार करणे
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करु नयेत असे पुराणात सांगितले आहे. असे केल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते आणि पुढील जन्मात तो अपंग जन्माला येऊ शकतो.
6. दही किंवा भात खाणे
सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करणे पुराणात निषिद्ध मानले गेले आहे. त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर भातही खाल्ला जात नाही.
7. दही दान करणे
दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो. अशा वेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख-समृद्धी दूर होते.
Astro tips for shoes | फाटलेले, तुटलेले शुज वापरताय? आत्ताच बदला नाहीतर शनीचा कोप झालाच म्हणून समजाhttps://t.co/JRR81eNQbs#astrotips | #ShaniDev | #Shoes | #shoesTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :