Vastu Tips | पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील
घरात पूजा स्थळाला सर्वात पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात पूजा-पठन करण्याला (Vastu Tips For Wealth) विशेष महत्व आहे. त्यासोबतच पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टीांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.
मुंबई : घरात पूजा स्थळाला सर्वात पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात पूजा-पठन करण्याला (Vastu Tips For Wealth) विशेष महत्व आहे. त्यासोबतच पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टीांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. मान्यता आहे की या वस्तूंना पूजा घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. त्याशिवाय सुख- समद्धी आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होतात (Vastu Tips For Wealth Keep These Things At Puja Sthal In House).
पूजा घरात या गोष्टींना ठेवल्याने सुख-समृद्धी आणि धन वृद्धी होते. सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहातो. चला जाणून घेऊ वास्तू शास्त्रानुसार कुठल्या गोष्टी पूजा घरात ठेवणे शुभ असते.
शंख
पूजा घरात शंख ठेवणे अत्यधिक शुभ असते. समुद्र मंथनावेळी देवी लक्ष्मीसोबत शंख ही निघाला होता. पूजेनंतर शंखनाद करणे चांगलं असते. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि धन राहातं.
शाळीग्राम
शाळीग्राम भगवान विष्णूचे रुप आहे. त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. शाळीग्रामची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी राहाते.
घंटी
घंटीच्या आवाजात सकारात्मक उर्जा असते. मान्यता आहे की ज्या घरांमध्ये घंटीचा आवाज नियमित येतो तिथे सकारात्मकता राहाते आणि निगेटिव्ह शक्ती दूर राहातात. पूजा-अर्चना करताना घंटी वाजवणे चांगले असते.
मोरपंख
अनेक लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात. वास्तू शास्त्रानुसार, याला शुभ मानलं जातं. भगवान श्री कृष्णही मुकुटावर मोरपंख लावतात. मोरपंखामुळे संपत्तीत वृद्धी होते. त्याशिवाय, यामुळे घरात सुख-शांती राहाते.
गंगाजल
कुठल्याही देवी-देवतांची पूजा असेल किंवा कुठलं अनुष्ठान असेल. त्यामध्ये गंगाजलचं विशेष महत्त्व असते. गंगाजलला पितळ आणि चांदीच्या पात्रात भरुन ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. यामुळे घरातील संपत्तीत वाढ होते.
कलश
पूजेदरम्यान घरात कलश ठेवला जातो. यामुळे घरात सुख-समृद्धी राहाते. कलश भगवान गणेशाला अतिप्रिय आहे. व्यस्त जीवनामुळे रोज कलश स्थापन करणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर स्नान करुन तांब्याच्या पात्रात जल भरुन त्यामध्ये आचमनी नक्की टाका आणि सायंकाळी पुन्हा हे जल बदला. कलशाच्या पाण्याला झाडात प्रवाहित करा.
Vastu Tips | करिअरमध्ये यश हवं असेल, तर ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल…https://t.co/iniQotEI6U#VastuTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
Vastu Tips For Wealth Keep These Things At Puja Sthal In House
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Zodiac Signs | या चार राशीचे लोक असतात भाग्यवान, कमी वयात गाठतात यशाची शिखरं, बक्कळ पैसाही कमावतात
बुधवारी ‘अशी’ करा गणेशाची पूजा, कधीही येणार नाही आर्थिक अडचण
Zodiac Signs | या चार राशींना आवडतं वर्चस्व गाजवायला, तुमची राशी तर नाही ना यात?