कितीही पैसे कामविल्यानंतरसुद्धा राहत असेल पैशांची तंगी, तर वास्तुशास्त्रातील या टिप्स नक्की वापरा
वास्तुशास्त्रातील नियमांचे पालन केल्यास घरात लक्ष्मी टिकून राहते. जाणून घेऊया या नियमांबद्दल.

विम्याच्या पैशासाठी पत्नीला संपवलेImage Credit source: Social Media
मुंबई, जीवनात पैसाच सर्वस्व नसते मात्र पैशांशिवाय कुठली गोष्ट पूर्णादेखील होत नाही. प्रत्येकाचं जण पैसा कमविण्यासाठी मेहनत करतात. अनेकजण समाधानकारक पैसे कमावतात देखील, मात्र तो पैसे टिकत नसल्याची अनेकांची तक्रार असते. हिंदू धर्मात संपत्तीशी संबंधित अनेक धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय नियम दिलेले आहेत. ज्यांचे पालन केल्यास निश्चितच फायदा मिळतो. सुख आणि संपत्तीशी संबंधित काही महत्त्वाच्या धार्मिक आणि वास्तुशास्त्रातील नियमांबद्दल जाणून घेऊया (Vastu Tips For Money).
- वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर बनवताना नेहमी वास्तु नियमांची काळजी घेतली पाहिजे. वास्तूनुसार चुकीच्या दिशेने बनवलेले स्वयंपाकघर आणि त्यामध्ये चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंचा कुटुंबियांवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार स्वयंपाकघर नेहमी आग्नेय दिशेला असावे आणि जर हे शक्य नसेल तर स्वयंपाकघरातील गॅसची शेगडी अशा प्रकारे ठेवली पाहिजे की ज्याचे तोंड आग्नेय दिशेला असेल. वास्तूनुसार गॅस स्टोव्ह आणि पाणी जवळजवळ ठेवू नये.
- धार्मिक मान्यतेनुसार, अंथरुणावर बसून किंवा बूट घालून अन्न खाऊ नये. असे मानले जाते की जे लोकं अंथरुणावर बसून अन्न खातात किंवा जेवल्यानंतर ताटात हात धुतात, त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच राहत नाही.
- हिंदू धर्मात अन्नाला देवतेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे अन्नाचा अनादर करू नये. अन्नाचा अनादर केल्यासदेखील घरात पैसे टिकत नाही.
- वास्तूनुसार घरातल्या नळातून किंवा पाइपमधून पाण्याची गळती होत असल्यास घरात पैसा टिकत नाही. याशिवाय हिंदू धर्मात देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा संपत्ती मिळविण्यासाठी केली जाते, परंतु केवळ असे करणे पुरेसे नाही. पैसे मिळवण्यासाठी त्याचा गैरवापर करू नये आणि ते घरामध्ये योग्य दिशेने ठेवावे. वास्तूनुसार उत्तर दिशेला स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी पैशांना ठेवावे.
हे सुद्धा वाचा

व्हॉट्सॲपचे नवीन सुरक्षा फीचर! नाही काढता येणार फोटो-व्हिडिओचा स्क्रीनशॉट

Astrology: आजचे राशी भविष्य, या’ तीन राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Diabetes Tips: डायबिटीजमध्ये उपयुक्त आहे हा घटक, कोलेस्ट्रॉलदेखील ठेवते नियंत्रणात

Home Loan: गृह कर्ज घ्यायचे आहे का? जाणून घ्या कोणत्या बँकेत किती व्याजदर आहे
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)