vat purnima 2022: उद्याची वट पौर्णिमा आहे विशेष; जाणून घ्या विधी आणि महत्त्व

हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत केले जाते (vat purnima 2022). हिंदू धर्मात या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात. मागच्या वर्षी कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे अनेकांना वट पूजा करण्यास मुकावे लागले, मात्र यंदा थोडी शिथिलता असल्याने स्त्रियांमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळत […]

vat purnima 2022: उद्याची वट पौर्णिमा आहे विशेष; जाणून घ्या विधी आणि महत्त्व
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 5:08 PM

हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत केले जाते (vat purnima 2022). हिंदू धर्मात या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात. मागच्या वर्षी कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे अनेकांना वट पूजा करण्यास मुकावे लागले, मात्र यंदा थोडी शिथिलता असल्याने स्त्रियांमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या 14 जूनला वट पौर्णिमा आहे. त्या निमित्याने बाजारपेठाही फुललेल्या दिसत आहेत. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा आहे.

वट पौर्णिमेचा मुहूर्त-

वट पौर्णिमा १४ जून रोजी साजरी होणार असून ही पौर्णिमा सोमवार, १३ जून रोजी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सुरू होईल आणि १४ जूनच्या संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील. या दरम्यान १४ जून रोजी सकाळी ११ ते १२.१५ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. वट पौर्णिमेच्या दिवशी साध्य योग आणि शुभ योगही तयार होत आहेत.

पूजेचा विधी-

वटपौर्णिमा व्रत पाळणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर आंघोळ करून कोणत्याही शुभ रंगाचे कपडे परिधान करावे. सावित्री, सत्यवान आणि यमाची मातीची मूर्ती वटवृक्षाखाली स्थापित करावी. या मुर्त्यांसह वडाची पूजा करावी. यानंतर झाडाभोवती कच्चे सूट गुंडाळून ३ परिक्रमा कराव्या.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.