Chemistree Vastu | घरात ख्रिसमस ट्री शुभ की अशुभ ? वाचा काय सांगतंय वास्तुशास्त्र
आपल्यापैकी अनेक जण ख्रिसमस ट्री घरात कार्यालये, मॉल, दुकाने आदी ठिकाणी ख्रिसमसच्या झाडांची सजावट केली जाते. पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असे करणे योग्य असते का ? वास्तुशास्त्रामध्ये झाडांचे वैशिष्ट्य आणि लाभ सांगण्यात आले आहेत.
मुंबई : नवीन वर्षाची चाहूल आता सर्वांनाच लागली आहे. प्रत्येक जण आपल्यापरीने नवीन वर्षाचे स्वागत करतो. पण वर्षाखेरीज एक सण येतो तो म्हणजे ‘नाताळ’. पाश्चिमत्य देशांमध्ये साजरा होणारा हा सण भारतात ही तितक्याच आवडीने साजरा केला जातो. या सणाची खासियत म्हणजे ख्रिसमस ट्री. आपल्यापैकी अनेक जण ख्रिसमस ट्री घरात कार्यालये, मॉल, दुकाने आदी ठिकाणी ख्रिसमसच्या झाडांची सजावट केली जाते. पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असे करणे योग्य असते का ? वास्तुशास्त्रामध्ये झाडांचे वैशिष्ट्य आणि लाभ सांगण्यात आले आहेत.
ख्रिसमस ट्रीच्या बाबतील काय सांगत वास्तुशास्त्र
वास्तुशास्त्रानुसार ख्रिसमस ट्री सजवणे खूप शुभ आहे. हे झाड वातावरणात सकारात्मकता आणि आनंद आणते. तसेच नकारात्मकता दूर करते. त्यामुळे तुम्हीही या ख्रिसमसला झाडाला सजवण्याचा विचार करत असाल तर या झाडाचा वापार नक्की करा. या झाडामुळे तुमच्या घरामध्ये सकारत्मकता येईल. त्याच बरोबर घरातील कुटुंबियांमध्ये प्रेम निर्माण होईल.
ख्रिसमस ट्री सजवताना या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही ख्रिसमस ट्री सजवत असाल तर लक्षात ठेवा की ते घराच्या दक्षिणेकडील भागात लावू नये. तुम्ही हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू शकता. यामुळे तुमच्या घरात पैसा खेळता राहील. याशिवाय, ख्रिसमस ट्री सजवताना लक्षात ठेवा की ते योग्य आकारात असले पाहिजे. तसेच ते सुंदर सजवा. अशा ख्रिसमस ट्रीमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे
संबंधीत बातम्या :
Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा