Vinayak Chaturthi 2022 | पौष महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व काय? जाणून घ्या तारीख, वेळ आणि पूजा करण्याची पद्धत

श्रीगणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट होतात आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. वरद चतुर्थीची तिथी, मुहूर्त आणि उपासना पद्धतीबद्दल जाणून घेऊया.

Vinayak Chaturthi 2022 | पौष महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व काय? जाणून घ्या तारीख, वेळ आणि पूजा करण्याची पद्धत
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 9:31 AM

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्याचे दोन भागात विभाजन केले आहे. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. या दोन्ही पक्षात एक चतुर्थी येते. जी चतुर्थी कृष्ण पक्षात येते तीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. तर जी चतुर्थी शुक्ल पक्षात येते तीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या वर्षातील पहिली पौष महिन्यातील विनायक चतुर्थी ६ जानेवारीला येत आहे. चला तर मग या चतुर्थीचे महत्त्व जाणून घेऊयात.

श्रीगणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट होतात आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. वरद चतुर्थीची तिथी, मुहूर्त आणि उपासना पद्धतीबद्दल जाणून घेऊया.

वरद चतुर्थी तिथी 2022 पंचांगानुसार, शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 5 जानेवारीला दुपारी 2.34 वाजता सुरू होईल आणि 6 जानेवारीला दुपारी 12.29 वाजता समाप्त होईल. 6 जानेवारी रोजी सकाळी 11.15 ते दुपारी 12.29 या वेळेत गणेशाची पूजा करता येईल.

विनायक चतुर्थीची आख्यायिका एका पुराणीक कथेनुसार, देवी पार्वती अंघोळ करत असताना तिने तिच्या शरिरावरील मैलापासून एका मुलाला तयार केले आणि त्याला जीवंत केले. त्यानंतर देवी पार्वतीने त्या मुलाला आदेश दिला की ती आंघोळ करणार आहे आणि या काळात कोणालाही आत येऊ देऊ नये. मुलाने आईच्या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आणि त्याने कंदाराच्या गेटवर पहारा देण्यास सुरुवात केली. काही वेळाने भगवान शिव यांचे आगमन तिथे झाले. मुलाने महादेवाला आत जाण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या भोलेनाथांनी आणि त्या मुलाचे शिर शरिरापासून वेगळे केले.

काही वेळानंतर, अंघोळ केल्यावर जेव्हा देवी पार्वती आळी आणि त्यांनी मुलाचे शिर शरिरापासून विभक्त झालेले पाहिले. हे पाहून देवी पार्वतीला खूप राग आला. देवी पार्वतीचा राग पाहून सर्व देवी-देवता भयभीत झाले. यानंतर, भगवान शिव त्यांच्या गणांना आज्ञा देतात की जंगलात जावून तुम्हाला जो प्राणी सर्व प्रथम दिसेल त्याला घेऊन या. शिव गण एका गजाला घेऊन येतात. भगवान शिव मुलाच्या शिराला मुलाच्या शरिराशी जोडतात. हे पाहून देवी पार्वती म्हणते की प्रत्येकजण माझ्या मुलाची थट्टा करेल. मग भगवान शिव त्याला एक वरदान देतात की तो गणपती म्हणून ओळखला जाईल आणि सर्व देवांनी त्याला वरदान दिले की, पहिली पूजा गणपतीची होईल. हाच तो विनायक चतुर्थीचा दिन.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Paush Amavasya : कोणतंच काम नीट होत नाही? पितृदोष असू शकतात कारणीभूत, पौष अमावस्येला काही उपाय नक्की करुन पाहा

Vastu Tips | काहीही झालं तरी चालेल पण या 5 गोष्टी कधीच कोणाला वापरु देऊ नका, नाहीतर …

Vastu Tips | सावधान ! वास्तू दोष तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करू शकतात, आजच करा योग्य ते बदल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.