Vinayak Chaturthi 2022: विनायकी चतुर्थी सर्वार्थसिद्धि आणि रवि योगात आलीय, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
गणेशाला समर्पित दर महिन्याला दोन चतुर्थी असतात. अमवस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. पैर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
Vinayak Chaturthi 2022: हिंदू पंचांगानुसार, (Hindu Panchang) यंदा विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) सर्वार्थ सिद्धि योगात आली आहे. विनायक चतुर्थीला पूर्ण दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आहे. शुभ कार्यासाठी हा खूप चांगला योग आहे. आजच्या दिवशी रवीचा योग ही आला आहे. गणेशाला समर्पित दर महिन्याला दोन चतुर्थी असतात. अमवस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. पैर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. विघ्नहर्त्याची भक्ती केल्याने मोठ मोठी विघ्न सहज दूर होतात. त्यामुळेच त्याला विघ्नहर्ता असं ही म्हणतात. या महिन्यात विनायकी चतुर्थी 4 मे ला म्हणजे आज आली आहे.
आजच्या विनायकी चतुर्थी मध्या काय विशेष ?
हिंदू पंचांगानुसार, यंदा विनायकी चतुर्थी सर्वार्थ सिद्धि योगात आली आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आलाय. शुभ कार्यासाठी हा खूप चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी रवी योग आलाय. वैशाख शुक्ल चतुर्थीची सुरूवात बुधवार 4 मे, सकाळी 07 वाजून 32 मिनिटांपासून गुरूवार, 05 मे पर्यंत आहे.
पूजा कशी कराल ?
सकाळच्या वेळी सकाळी लवकर उठून अंघोळ करून सकाळची कामे लवकर पार पाडा. लाल रंगाचे वस्त्र वापरा. सूर्याची पूजा करा सूर्या देवाला अर्ध्य दान करा. गणपत्ती बाप्पाच्या मंदिरात एक शेंडीवाला नारळ आणि मोदकांचा नौवेद्य प्रासद म्हणून घेऊन जा. जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अपर्ण करा. ओम गं गणपतेय नम: मंत्र 27 वेळा जप करा. कापूर धूप आणि दिवा लावा. दुपारी पूजेच्या वेळी घरात असलेल्या गणेशाच्या मूर्तीचे पूजन करा. (Lord ganesha pujan) मनोभावे पूजा अर्चा करून श्री गणेशाची आरती करा आणि मोदकांचा नौवेद्य घरात सर्वांना वाटा. लहान मुलांना द्या.
धन प्राप्तीसाठी हे उपाय करा
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून श्री गणेशाची पूजा करा. देवाल दूर्वांची जुडी अर्पण कारा. त्याच बरोबर शुद्ध तूप आणि गूळाचा नैवेद्य द्या. त्यानंतर “वक्रतुण्डाय हुं” मंत्राचा 54 वेळा जप करा. धनप्राप्ती होण्यासाठी प्रार्थंना करा. त्यानंतर तुप आणि गुळ गाईला खायला द्या. गरिबाला दान करा. धनाची समस्या दूर होईल. असं न चुकता पाच विनायकी चतुर्थीला करा तुम्हाला धन लाभ नक्की होईल.