विठ्ठलाच्या मंदिरात तुळजाभावानी मंदिराची पुनरावृत्ती? प्राचीन दागीण्यांची नोंद दाळेबंदात नाही

आर्थिक गैरव्यव्हार प्रकरणी एसआटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात येत आहे. 2016 पासून नियुक्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी तसेच ही समिती बरखास्त करून  अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी होत आहे. 

विठ्ठलाच्या मंदिरात तुळजाभावानी मंदिराची पुनरावृत्ती? प्राचीन दागीण्यांची नोंद दाळेबंदात नाही
विठ्ठल रूक्मिणी मंदिर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 3:04 PM

पंढरपूर : तुळजाभवानी मंदिरात देवीचे सोन्याचे मुकूट आणि प्राचिन दागीण्यांच्या गायब होण्याच्या प्रकाराची बातमी ताजी असतानाच आता आणखी एका देवस्थानाचा गैर प्रकार चव्हाट्यावर येण्याची चिन्ह आहेत.  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीस (Vitthal Rukmini Temple Fraud) राजे-महाराजे, पेशवे संस्थानिक यांनी प्राचीन मौल्यवान दागिने भेट दिली आहेत. मात्र, या 315 दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार समितीच्या सन 2021-22 लेखापरीक्षण अहवालात उघड झाला आहे. यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अनेक वस्तूंची नोंदच नाही

विठू माऊलीच्या दर्शनासाठी दररोज पन्नास हजाराहून अधिक भाविक येतात तर यात्रा कालावधीत लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत आसतात. येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळावी म्हणून शासनाने सण 1985 सालीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना करण्यात आली. सण 2021-22 चा लेखापरीक्षण मंदिर समिती वतीने करण्यात आले आहे. यात अनेक वस्तूच्या नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. सभामंडपासमोरील दरवाजे, गरुडखांब, विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाबारा, चौकांबी येथील चौकट व दरवाजा खजिना आतील दरवाजा, विठ्ठल मुख्य गाभारा, भाविक विठ्ठल रुक्मिणीला दागिने अर्पण करतात. हे दागिने पिशवीमध्ये सिलबंद न करता तसेच ठेवले जातात. यामुळे हे दागिने गहाळ होण्याची शक्यता आहे. मंदिरातील सात कर्मचाऱ्यांना सन 2010 सा मंदिर समितीने 1 लाख 70 रुपये उचल दिली आहे. मात्र, याची वसुली अद्याप करण्यात आलेली नाही.

रेल्वे विभाग व मंदिर समितीचा सुलभ स्वच्छालय बांधण्याचा करार झाला होता. यासाठी मंदिर समितीने रेल्वेला एक कोटी 54 लाख रुपये दिले आहे. भाडे म्हणून प्रतिवर्षी चार लाख 50 हजार रुपये देण्यात आले आहे. मात्र, अद्याप एकही शौचालय बांधण्यात आलेले नाही. गोशाळेतील जनावरांची काळजी मंदिर समितीकडून घेतली जात नाही. दररोज येणाऱ्या दुधाचा व शेणाचा हिशोब ठेवला जात नाही. राजे महाराजे, संस्थानिक व पेशवे यांनी विठ्ठल रुक्मिणीस मौल्यवान प्राचीन दागिने दिले आहेत. मात्र, विठ्ठलाचे 203 व रुक्मिणी मातेचे 111 दागिन्याची नोंद ताळेबंदमध्ये दिसून येत नाही. यामुळे संशय व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

एसआटी गठीत करून चौकशीची मागणी

आर्थिक गैरव्यव्हार प्रकरणी एसआटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात येत आहे. 2016 पासून नियुक्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी तसेच ही समिती बरखास्त करून  अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.