Sankashti Chaturthi 2021 | कधी असणार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त
संकष्टी चतुर्थी व्रत 2021 हे या वर्षातील शेवटचे व्रत आहे. चला तर मग जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थी व्रताची तारीख, पूजेची वेळ आणि चंद्र उगवण्याची वेळ.
मुंबई : काही दिवसाचत 2021 हे वर्ष संपणार आहे. कोरोना संकटामुळे मागील संपूर्ण वर्ष अडचणीच गेले. पण आता मात्र सर्वकाही स्थिरावत आहे. या कठीण काळात सकारात्मक उर्जोसाठी आपल्याला मदत झाली ती पुराणांतील मंत्रांची आणि देवांची.
भगवान गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजले जाते. संकष्टी म्हणजे अडचणींपासून मुक्ती. असे मानले जाते की भगवान गणेश भक्तांच्या समस्या दूर करतात आणि अडथळे दूर करतात. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते.
कधी असणार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी
या सरत्या वर्षात 2021 संपणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर पौष महिना सुरू झाला आहे. यावेळी पौष महिन्यात चतुर्थी व्रत 22 डिसेंबरला ठेवण्यात येणार आहे. संकष्टी चतुर्थी व्रत 2021 हे या वर्षातील शेवटचे व्रत आहे. चला तर मग जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थी व्रताची तारीख, पूजेची वेळ आणि चंद्र उगवण्याची वेळ.
संकष्टी चतुर्थी 2021 तारीख आणि पूजा मुहूर्त (संकष्टी चतुर्थी तिथी आणि पूजा मुहूर्त) पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी बुधवार, २२ डिसेंबर रोजी दुपारी ४:५२ पासून सुरू होऊन तिथी गुरुवार, 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 06:27 वाजता समाप्त होईल. संकष्टी चतुर्थी तिथी (संकष्टी चतुर्थी 2021) मध्ये चंद्राची पूजा महत्त्वाची असते.
संकष्टी चतुर्थी 2021 रोजी संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या संकष्टी चतुर्थीला रात्री 08:12 वाजता चंद्राचा उदय होईल. या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन घेणे अत्यंत पुण्य मानले जाते. चंद्रदर्शनाशिवाय हे व्रत अपूर्ण असल्याचे सांगितले जाते.
संकष्टी चतुर्थी पूजा विधी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ व धुतलेले कपडे परिधान करावेत. या दिवशी सकाळी लाल रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. शुद्ध मानाने गणपतीची पुजा करा आणि संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून व्रत पूर्ण करा.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या :
Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा
Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा
Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी