Mohini Ekadashi 2022: कधी आहे मोहिनी एकादशी? जाणून घ्या तिथी, पुजेचा शुभ मुहूर्त आणि महत्व
मोहिनी एकादशीच्या दिवशी विष्णु देवाची मोहिनी स्वरूपात पूजा केली जाते. यादिवशी मनोभावे विष्णु देवाची पूजा करावी.
Mohini Ekadashi 2022: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. यादिवशी विष्णु देवाची मोहिनी स्वरूपात पूजा केली जाते. जाणून घेऊया यंदा मोहिनी एकादशीचा उपवास कधी केला जाईल.
हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्व आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी असतात. वर्षात तिथीनुसार एकुण 24 एकादशी असतात. हा दिवस विष्णु देवाला समर्पित आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशीचा (Mohini Ekadashi 2022) उपवास ठेवला जातो. यादिवशी विष्णु देवाची मोहिनी स्वरूपात पूजा केली जाते. यादिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पाप आणि दु: खांपासून मुक्ती मिळते. यादिवशी व्रत कथासाराचे पाठण केल्याने 1000 गाईंचे दान केल्या इतके पुण्य लाभते. जाणून घेऊया शुभ मुहूर्त (Shubh Muhurt) आणि पूजा विधी. यावर्षी मोहिनी एकादशी गुरूवारी 12 मे ला आल्याने त्यादिवशी हा उपवास करता येईल.
मोहिनी एकादशी 2022 शुभ मुहूर्त (Mohini Ekadashi)
मोहिनी एकादशी तिथीची सुरूवात 11 मे बुधवार संध्याकाळी 7: 31 ला होईल. मोहिनी एकादशी तिथी 12 मे गुरूवार संध्याकाळी 6: 51 ला होईल. उदया तिथीनुसार मोहिनी एकादशीचा उपवास 12 मे ला करावा. पूजा तुम्ही सकाळीच करावी.
मोहिनी एकादशी 2022 पारण वेळ
मे महिन्यातील 12 तारखेला जे लोक उपवास ठेवणार ते दुसऱ्यादिवशी 13 मे शुक्रवारी सुर्योदयानंतर उपवास सोडू शकतात. पारण वेळ सकाळी 5:32 पासून सुरू होऊन सकाळी 8:14 मिनिंटापर्यंत असेल. द्वादसी तिथीचे समापन 13 मे संध्याकाळी 5: 42 ला होईल.
मोहिनी एकादशीचे महत्व
मोहिनी एकादशीच्या दिवशी विष्णु देवाची मोहिनी स्वरूपात पूजा केली जाते. यादिवशी मनोभावे विष्णु देवाची पूजा करावी. एकादशी कथासार यादिवशी ऐकल्याने सर्व समस्या कमी होतात. असं केल्याने मोक्ष प्राप्ती होते. सर्व पापांपासून मुक्ती मिळते. यादिवशी उपवास केल्याने व्यक्तिला प्रत्येक कामात यश प्राप्त होतं.
अशा प्रकारे विधीवत पूजा करा
मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करा. अंघोळ केल्यानंतर घराची साफ सफाई, स्वच्छता करा. स्वच्छ नवे वस्त्र परिधान करा. देवघराची स्वच्छता करा. एका पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरा. पाटावर विष्णु देवाची मूर्ती स्थापन करा. देवाला चंदनाचा टिळा लावा. विष्णू देवाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा.धूप, दिवा आणि कापूर लावा, नैवेद्य दाखवा. मोहिनी एकादशी कथासार वाचा. गरजू लोकांना मदत करा. संध्याकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावल्यावर आरती करा. दुसऱ्या दिवशी तिथीनुसार उपवासा सोडा.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)