Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2022 | या तारखेला होणार 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण, 4 राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. सूर्यग्रहणाचासुद्धा काही राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

Surya Grahan 2022 | या तारखेला होणार 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण, 4 राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
solar Eclips and zodiac
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 2:51 PM

मुंबई :  हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. पुराणानुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही ग्रहण होणार आहे.  चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र (Moon) व सूर्य यांची युती असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. 2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल, शनिवारी होणार असून. भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील. मात्र, भारतातील हे पहिले सूर्यग्रहण अंशत:  असेल.

हे सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये पाहता येणार आहे. आकाशात घडणाऱ्या गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर खोल परिणाम होत असतो. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार या सूर्यग्रहणाचासुद्धा काही राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमची अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. या काळात केलेले सर्व प्रवास फायदेशीर ठरतील.

कर्क राशीसाठीही हे ग्रहण शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या कामात यश मिळेल. त्याच प्रमाणे तुम्हाला मित्रांकडून लाभ मिळू शकतो आणि त्याच वेळी नोकरीच्या ठिकाणी आणि समाजात तुमची कीर्ती वाढ होऊ शकते. हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असणार आहे.

तूळ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप शुभ असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. भागीदारीच्या कामातही नफा अपेक्षित आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या संदर्भात कामाच्या ठिकाणी वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता.

धनु- तुमची आर्थिक स्थिती बरीच सुधारेल. हे ग्रहण सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही शुभ आणि फलदायी ठरेल. नोकरदारांना परदेशात नोकरी मिळेल. हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा आणि उत्कर्षाचा असणार आहे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : ‘बचके रहना रे बाबा’ या 5 लोकांशी शत्रुत्व म्हणजे स्व:ताचे नुकसान

09 March 2022 Panchang | 09 मार्च 2022, बुधवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Vastu tips | काय सांगताय प्रेग्नन्सी संबंधित असतात वास्तूनियम !, समजून घेऊन, योग्य ती काळजी घ्या

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.