पूजा करताना का लावली जाते अगरबत्ती? जाणून घ्या शास्त्रीय कारण आणि महत्त्व
हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेचे नियम सांगितले आहेत, हिंदू मान्यतेनुसार या नियमांचे पालन केल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते. यापैकी एक गोष्ट म्हणजे अगरबत्ती. पूजेच्या वेळी अगरबत्ती आणि अगरबत्ती लावण्याच्या काही नियमानबद्दल सांगण्यात आले आहे. जाणून घ्या काय आहेत नियम आणि त्याचे महत्त्व
हिंदू धर्मामध्ये रोज सकाळ संध्याकाळ पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. शास्त्रानुसार आणि नियमानुसार पूजेसोबत आपल्या आवडत्या देवतांचे स्मरण केल्यास कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. असे मानले जाते की पूजा केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक सुख प्राप्त होते आणि त्याच्या कामातील अडथळे दूर होतात त्यासोबतच मनःशांती देखील मिळते. त्यामुळे पूजा नेहमी विधीनुसारच करावी.
पूजा करताना दिवा लावण्याची परंपरा आहे. यासोबतच अगरबत्ती जाळण्यालाही विशेष असं महत्त्व दिले आहे. ज्योतिष शास्त्रात अगरबत्ती हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की पूजेच्या वेळी अगरबत्ती जाळल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरावर राहते. त्यासोबतच पूजा करणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो. पण पूजा करताना किती अगरबत्ती लावायच्या हे तुम्हाला माहिती आहे का ? माहिती नसेल तर ते जाणून घ्या.
किती अगरबत्ती लावायच्या?
ज्योतिषांच्या मते पूजेच्या वेळी नेहमी अगरबत्ती लावावी. यामुळे उपासनेचे पूर्ण फळ मिळते. या काळात नेहमी दोन अगरबत्ती पेटवाव्यात. असे मानले जाते की पूजेच्या वेळी दोन अगरबत्ती लावल्याने सर्व देवी देवतांची कृपा कुटुंबावर राहते. तसेच चार अगरबत्ती जाळल्याने अधिक फायदा होतो. साधारणपणे धार्मिक विधींमध्ये चार अगरबत्ती जाळल्या जातात. या अत्यंत शुभ मानल्या जातात.असे मानले जाते की चार अगरबत्ती जाळल्याने सर्व समस्या दूर होतात.
अगरबत्ती जाळण्याचे महत्त्व
घरामध्ये पूजा करताना दररोज अगरबत्ती जाळल्याने कुटुंबात सकारात्मकता टिकून राहते. असे मानले जाते की अगरबत्ती जाळल्याने त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. ज्यामुळे मन शांत आणि आनंदी होते. यामुळे तणावातूनही आराम मिळतो. एवढेच नाही तर एकाग्रता देखील वाढते.
अगरबत्ती जाळण्याचे शास्त्रीय कारण
शास्त्रज्ञांच्या मते अगरबत्ती जाळल्याने सूक्ष्मजीवाणू नष्ट होतात. त्यांचा असा विश्वास आहे की पूजेसाठी बनवलेला अगरबत्ती मध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या कीटकांना दूर पळवण्यास देखील मदत करतात. यामुळे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका कमी होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)