AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shree Ganesha | भगवान श्री गणेशाचे वाहन मूषक का? चला जाणून घेऊ ही पौराणिक कथा…

तुम्ही कधी विचार केला आहे की एवढ्या मोठ्या गणेशाचं वाहन उंदीर का आहे (Lord Ganesha Ride The Mouse)? सर्व देवतांमध्ये एकापेक्षा चागंली वाहनं आहेत, परंतु सर्वप्रथम पूजल्या जाणाऱ्या गणपतीजवळ छोटासा मूषक का आहे?

Shree Ganesha | भगवान श्री गणेशाचे वाहन मूषक का? चला जाणून घेऊ ही पौराणिक कथा...
Lord-Ganesha-Mouse
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 2:48 PM

मुंबई : तुम्ही कधी विचार केला आहे की एवढ्या मोठ्या गणेशाचं वाहन उंदीर का आहे (Lord Ganesha Ride The Mouse)? सर्व देवतांमध्ये एकापेक्षा चागंली वाहनं आहेत, परंतु सर्वप्रथम पूजल्या जाणाऱ्या गणपतीजवळ छोटासा मूषक का आहे? चला जाणून घेऊ की श्री गणेश यांचं वाहन का आहे आणि वास्तवात मूषक कोण आहे (Why Lord Ganesha Ride The Mouse Know The Pouranik Katha )?

क्रौंचला श्राप

एका प्रचलित कथेनुसार, क्रौंच हा अर्धदेवीये आणि अर्धिराक्षसिय प्रवृत्तीचा नर होता. एकदा भगवान इंद्रदेवाने आपल्या सभेत सर्व ऋषींना आमंत्रित केले. या बैठकीला क्रौंच यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. येथे, क्रौंचचा पाय चुकून एका ऋषींच्या पायावर पडला. यामुळे संतप्त होऊन ऋषींनी क्रौंचला उंदीर बनण्याचा श्राप दिला. क्रौंचने ऋषीकडे क्षमा मागितली परंतु ते त्यांचा श्राप परत घेऊ शकले नाही.

पण त्यांनी क्रौंचला एक वरदान दिला. येणाऱ्या काळात ते शिवपुत्र गणेशाचे वाहन होतील. क्रौंच काही साधा उंदीर नव्हता, एक विशाल उंदीर होता, जो काही मिनिटांत डोंगरांना कुरतडून टाकायचा. त्याची दहशत इतकी होती की ते जंगलात राहणाऱ्या ऋषी-मुनींना खूप त्रास देत असत.

त्याचप्रकारे त्याने ऋषी पराशर यांची झोपडीही नष्ट केली. महर्षि पराशर हे भगवान श्री गणेशाचे ध्यान करत होते. झोपडीच्या बाहेर उपस्थित सर्व ऋषींनी त्याला दूर नेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते भगवान शिवकडे गेले आणि त्यांना सर्व काही सांगितले.

उंदीर पकडण्यासाठी गणेशजींनी दोरी फेकली. या सापळ्याने उंदराचा पालाळ लोकपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले आणि गणेशासमोर आणले. गणेशजींना या आपत्तीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या चिडलेल्या उंदराने कोणतेही उत्तर दिले नाही. गणेश म्हाणाले की, आता तू माझ्या आश्रयमध्ये आहेस, म्हणून तुला जे हवे ते माग, पण महर्षी पराशरला त्रास देऊ नकोस.

गणेशाने उंदराची स्वारी करण्याची इच्छा व्यक्त केली

यावर गर्विष्ठ उंदीर म्हणाला, “मला तुमच्याकडून काही नको आहे. होय, आपण इच्छित असल्यास आपण मला काहीही मागू शकता.” हा अभिमान पाहून गणेशजींनी त्या उंदरास सांगितले की त्यांना त्याच्यावर स्वार व्हायचे आहे. उंदराने गणपतीचे ऐकले आणि त्यांनी गणेशाला स्वत:वर स्वार होण्यास सहमती दर्शविली. पण गणेशजी त्या उंदरावर बसताच उंदिर त्यांचे वजन सहन करु शकला नाही. उंदराने खूप प्रयत्न केले पण गणेशजींना घेऊन एक पाऊलदेखील पुढे जाऊ शकला नाही.

उंदरचा अभिमान चिरडला गेला आणि त्याने गणपतीकडे क्षमा याचना केली. मी तुमच्या वजनाने दबतो आहे. उंदराची क्षमा स्विकारत गणेशजींनी आपले वजन कमी केले आणि अशाप्रकारे मूषक गणेशजींचे वाहन बनले.

Why Lord Ganesha Ride The Mouse Know The Pouranik Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shanidev | ‘या’ लोकांवर शनिदेव राहतात प्रसन्न, पूर्ण होतात सर्व मनोकामना…

Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…

जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत…

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.